नारायणगाव महाविद्यालयाची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात: डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई

नारायणगाव (किरण वाजगे)

नारायणगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी विराजमान व स्थापन केलेल्या गणपती बाप्पाचे आज उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले.

यावेळी डीजेच्या तालावर विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य करत आनंदाची लयलूट केली. याप्रसंगी जुन्नर तालुका औद्योगिक केंद्राचे प्रमुख युवा नेते अमित बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुजित खैरे, नियोजन मंडळाचे सदस्य विकास दरेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, प्रा. सुभाष कुडेकर, प्रा ओंकार मेहेर, अतुल आहेर, जयेश कोकणे, अक्षय खैरे, गणेश वाजगे, शेखर शेटे, आकाश खैरे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव शाखेमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Next articleसर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतरण दिनाच्या निमित्ताने कार्यगौरव पुरस्काराचे वितरण पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष प.पु.प.म.मुकुंदराज बाबाजी कपाटे