सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतरण दिनाच्या निमित्ताने कार्यगौरव पुरस्काराचे वितरण पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष प.पु.प.म.मुकुंदराज बाबाजी कपाटे

उरुळी कांचन

पुणे जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अष्टशताब्दी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेमार्फत कार्य गौरव पुरस्कार पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्ष प.पु.प.म.मुकुंदराज बाबाजी कपाटे तसेच पुणे जिल्हा महानुभाव परिषद प्रचारमंत्री तथा पत्रकार अमोल बाबासाहेब भोसले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, अ.भा.म.प.अध्यक्ष महंत विद्वांस बाबा शास्त्री यांच्या अध्यक्षते खाली धर्मसभा संपन्न झाली. या सभेत महंत नागराज बाबा, महंत राहेरकर बाबा, महंत श्रीबाळापुरकर बाबा, महंत श्रीसातारकर बाबा, महंत कृष्णराज शास्त्री बाबा, महंत संतोषमुनी शास्त्री, राष्ट्रीय अध्यक्ष खंडुदेव भगवानराव कठारे, राष्ट्रीय निरिक्षक रामदास खोत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाषजी रूपचंजी कोठारी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, पुणे जिल्हा मानवाधिकार अध्यक्ष ओमकार शेरे, जनसंपर्क अधिकारी पुणे जिल्हा आशिष गायकवाड, पुणे जिल्हा महानुभाव परिषद महामंत्री संजय वनारसे आदी संत, महंत, आचार्य, तपस्वीनी, सदभक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनारायणगाव महाविद्यालयाची गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात: डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई
Next articleमांडवगण फराटा येथे तेरा ठिकाणी घरफोडी करणारे अट्टल चोराना पुन्हा दरोड्याच्या तयारीत असतानाच केडगाव पोलीसांनी केले जेरबंद : यवत पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी!