संशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया-डॉ.एन.एस.गायकवाड

दिनेश पवार : दौंड

संशोधन ही अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे.आपल्या हातून समाजोपयोगी संशोधन घडायला हवे.आपण लोकांच्या कल्याणासाठी संशोधन करावे.जर गुणवत्ता पूर्ण संशोधन केले तर त्याची दखल जागतिक स्तरावर घेतली जाते.महात्मा जोतीराव फुले,संत ज्ञानेश्वर यांनी मराठी साहित्याला दिलेले योगदान आजही उपयुक्त आहे.

मार्गदर्शकाने स्वतः ची गुणवत्ता राखून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायला पाहिजे असे विचार प्राचार्य डॉ.एन. एस.गायकवाड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मराठी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित मराठी पीएच.डी.सिनोप्सेस सादरीकरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी डॉ.राजेंद्र थोरात, डॉ.नानासाहेब पवार, डॉ.अरुण कोळेकर, मराठी विभाग प्रमुख डॉ.राजेंद्र ठाकरे,उपप्राचार्य डॉ.संजय जडे,डॉ.संजय जगताप,डॉ.संदीप वाकडे,प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन नम्रता मेस्त्री यांनी केले.आभार डॉ.अतुल चौरे यांनी मानले.

Previous articleलंडनमध्ये श्री गणरायाची दहा वर्षापासून होतेय स्थापना
Next articleहडपसर ते उरळी कांचन दरम्यान एलिव्हेटेड रस्त्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांची कामे मार्गी: खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून केंद्रीयमंत्री गडकरी यांचे आभार