कड्यावरील गणपती चरणी गिर्यारोहक नतमस्तक

राजगुरूनगर- सह्याद्री खोऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात आणि माथेरान डोंगर रांगेच्या कड्यावर नेरळ माथेरान मिनी ट्रेन चे मोटारमन श्री राजाराम खडे व त्यांचे सहकारी यांच्या तब्बल १४ वर्षांच्या परिश्रमानंतर साकारण्यात आलेल्या ५२ फुटी कड्यावरच्या निसर्गराजा गणपती चरणी स्वराज्य ट्रेकर्स ग्रुप (मोशी) आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी नतमस्तक होत, जयजयकार करीत गणरायांच्या आगमनाचे मोठ्या भक्ती भावाने जल्लोषात स्वागत केले.

या मोहिमेची सुरवात माथेरान वाहनतळ क्षेत्रातून झाली. टॉयट्रेनच्या रुळावर अर्ध्या तासाची पदभ्रमंती केल्यावर कड्यावरच्या निसर्ग राजा गणपतीचे दर्शन होते. एका बाजूला १८०० फूट खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच डोंगररांगेत प्रसन्न करणाऱ्या गणपतीचे भव्य दिव्य आणि उंचच उंच रूपास गिर्यारोहकांनी येथून वंदन केले.

पुढे नेरळ माथेरान रुळाचा मार्ग सोडून दरी मध्ये उतरत छोट्या निसरड्या पाऊलवाटेने १५ मिनिटांची पदभ्रमंती करीत ५२ फुटी कड्यावरील गणपतीच्या पायथ्याशी जात गिर्यारोहकांनी नतमस्तक होत जयजयकार करीत मोठ्या उत्साहात गणरायांचे स्वागत केले.

या मोहिमेत स्वराज्य ट्रेकर्स ग्रुप(मोशी) आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या अरुण देशमुख, आमित साळुंखे, समीर राहणे, माणिकराव पाटील, भागवत यादव, सज्जन ताकतोडे, संतोष दिवेकर, विशाल सोनावणे, राहुल वावळ, नितीन हुंबड, बाबाजी शेटे, रवि गाढवे, तानाजी राजगुडे, संतोष सोनावणे आणि डॉ.समीर भिसे हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.

Previous articleभारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रवींद्र हिमते यांची निवड
Next articleभारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी रवींद्र हिमते यांची निवड