श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या विश्वस्तपदी जयसिंगराव काळे पाटील यांची नेमणूक

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील श्री हरिश्चंद्र महादेव संस्थानच्या विश्वस्तपदी जयसिंगराव बाळासाहेब काळे पाटील यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती श्री हरिश्चंद्र महादेव संस्थेचे अध्यक्ष प्रंशात काळे तसेच सचिव नवनाथ काळे यांनी दिली.

श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान घोडेगाव या देवस्थानच्या एकूण १३ जागा पैकी १ विश्वस्ताची जागा रिक्त होती. दि २६/७/२०२२ रोजी मासिक सभेच्या ठरावाद्वारे रिक्त विश्वस्त पद भरण्यात आले

यावेळी श्री जयसिंग बाळाजी उर्फ बाळासाहेब काळे यांची एकमताने श्री हरिचंद्र महादेव संस्थांच्या विश्वस्तपदी नेमणूक करण्यात आली तसेच सल्लागार म्हणून श्री विजय महादेव घोडेकर,श्री रविंद्र दिगंबर कर्पे, श्री संजय महादेव नांगरे ,श्री गजानन अंबादास काळे, श्री दीपक दगडूशेठ लोढा व श्री कैलास चिंतामण सोमवंशी व श्री प्रशांत विठ्ठल गाढवे, श्री स्वप्नील जनार्दन कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली.,

Previous articleअबेरडेअर टेक्नोलोजीस प्रायव्हेट लिमिटेड कडून कनेरसर येथील शाळांना शालेय दप्तरांचे वाटप
Next articleकु.रणजित शितोळे यांनी कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी, लंडन, यूनाइटेड किंगडम मधुन ऑटोमोटिव्ह अँड ट्रान्सपोर्ट डिझाइन डिग्री मिळवली