दौंड-पुरंदर तालुक्यातील जिरायती-बागायती भागातील सर्व तलाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पुर्ण क्षमतेने भरून घ्यावीत – उमेशभैय्या म्हेत्रे

कुरकुंभ,सुरेश बागल

 दौंड तालुक्यातील व पुरंदर तालुक्यातील सर्व तलाव पुरंदर उपसा,जानाई – शिरसाई योजनेच्या पाण्यातून शेलार वाडी,माटोबा, दौंड, वरवड, ताम्हणवाडी, कासुडी॔, भरतगाव,खोर,मळद,टेकवडी तसेच तलाव भरून घेण्याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अधिकारी गणेश टेगले साहेबांना दि. २७-७-२०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे व किशोर वचकल यांनी निवेदन देऊन पाणी तलावात सोडण्यासाठी विनंती केलेली आहे .

कारण खडकवासला धरण क्षेत्रात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला धरण व पवना धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊन ८० ते ९० टक्के भरले आहेत .तरीही सध्या भिमा,मुळा-मुठा नदीच्या पात्रात तसेच मुळा- मुठा नवीन कॅनल भरून वाहत आहे. तरीही दौंड-पुरंदर तालुक्यातील जिरायती – बागायती भागांतील सर्व तलाव १०-१५ टक्केच शिल्लक राहिले आहेत. तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर नदीच्या, कॅनलच्या पाण्याने तलाव भरून घ्यावीत परत पावसाचेही पुढे पडेल म्हणून शाश्वती नसल्याने पुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने तलाव भरून घ्यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे व समतासैनिक किशोर वचकल
पाटबंधारे विभागाला केलेली आहे.

Previous articleविद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
Next articleसंरक्षण , सरकारी ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार :भारतीय मजदूर संघ