विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

नारायणगाव : किरण वाजगे)

रोटरी क्लब नारायणगाव तसेच जुन्नर एज्युकेशन सोसायटी आणि पूर्तता ऑप्टिशियन्स यांच्या वतीने जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील चौदाशे पन्नास विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर हनुमंत भोसले यांनी दिली.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांच्या वाढत्या तक्रारी, मोबाईल फोनचा वापर वाढल्यामुळे डोळ्यांना होणाऱ्या समस्यां निवारण्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये पूर्तता ऑप्टिशियन्स च्या वतीने रोटरियन योगेश भिडे आणि अमृता भिडे यांनी दिनांक २४ ते २७ जुलै या दरम्यान शंकरराव बचट्टे पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली.
या शिबिरासाठी डॉक्टर मयुरेश वामन यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे मंगेश मेहेर, हेमंत महाजन, सचिन घोडेकर, तेजस वाजगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleनारायणगाव येथे हिपॅटायटिस ‘बी’ चे मोफत लसीकरण
Next articleदौंड-पुरंदर तालुक्यातील जिरायती-बागायती भागातील सर्व तलाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पुर्ण क्षमतेने भरून घ्यावीत – उमेशभैय्या म्हेत्रे