संत शिरोमणी श्री सावतामाळी महाराज यांच्या ७२७ व्या पुण्यतिथी निमित्त अखिल माळी समाज संघाच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

उरुळी कांचन

अखिल माळी समाज संघाच्या वतीने यावर्षी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कार्यगौरव पुरस्कार ड्रीम्स फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपला देण्यात आला, तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कार्यगौरव पुरस्कार आशासेविका (प्राथमिक आरोग्य केंद्र) यांना देण्यात आला आणि सत्यशोधक परिवर्तन पुरस्कार २०२२ कस्तुरी प्रतिष्ठान यांना देण्यात आला. वरील तीनही पुरस्कार प्रामुख्याने गेल्या दोन वर्षातील त्यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्याची नोंद घेऊन पुरस्कार्थीनां गौरवण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे माजी कृषी अधिकारी सुनिल लांडगे, त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये जीवनातील पाप कमी करण्यासाठी रोज जप करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत हे होते, त्यांनी आजही मनुष्याने सकारात्मक विचारांचे मनन केल्यास त्यांच्याही आयुष्यात संत सावतामाळी प्रमाणे उत्तम बाग फुलवली जाऊ शकते आणि अनेक शतकांनंतर आजही संत महात्म्यांचे विचार आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनात लागू होतात परंतु या संत किंवा राष्ट्रपुरुषांना काही नाठाळांनी जातीपातीत विभागून टाकल्याची खंत व्यक्त केली.

ज्येष्ठ लेखक कादंबरीकार लक्ष्मण सूर्यभान घुगे तसेच गुरुदत्त भजनी मंडळ यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमास शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, पंचायत समिती सदस्या हेमलताताई बडेकर, सरपंच राजेंद्र कांचन, अर्जुन कांचन, लक्ष्मण जगताप, संजय टिळेकर, मिलिंद जगताप, समता परिषद अध्यक्ष गणेश टिळेकर, किरण झगडे, राजेंद्र टिळेकर, बाळासाहेब चौरे, पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष विजय टिळेकर व मोठ्या संख्येने भाविक वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल माळी समाज संघाचे अध्यक्ष संजय रायकर, प्रशांत लोंढे, निखिल लोंढे, भानुदास जगताप, अनिल लोंढे, निखिल जगताप, धनाजी जगताप, रवी आगरकर, कानिफनाथ लोंढे, बाळासाहेब ताम्हणे व विकासदादा जगताप यांनी प्रामुख्याने केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम काकडे यांनी केले तर सर्वांचे आभार गोविंद शिवरकर यांनी मानले.

Previous articleजुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटाचे तर पंचायत समितीच्या १८ गणांचे आरक्षण जाहीर
Next articleउरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या फलकाचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते अनावरण