जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटाचे तर पंचायत समितीच्या १८ गणांचे आरक्षण जाहीर

नारायणगाव,किरण वाजगे

जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटाच्या तर पंचायत समितीच्या १८ गणांच्या
आरक्षण सोडतीची घोषणा गुरुवारी (दि.२८) उपजिल्हाधिकारी श्रीमंत माने यांच्या उपस्थितीत तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी केली.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने सोडत जाहीर करण्यात आली. मागील चार निवडणुकांचे आरक्षणानुसार चक्राणुक्रमे प्राधान्यानुसार निश्चित करण्यात आले आहे. तालुक्यातील अनुसूचित जाती १ जागा (महिला), अनुसूचित जमात ४ जागा (पैकी २ महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ जागा (पैकी २ महिला) व सर्वसाधारण ९ जागा (पैकी ४ महिला) या १८ जागांचे आरक्षण विविध पक्षांच्या प्रतिनिधींसमोर जाहीर करण्यात आले.
दरम्यान जिल्हा परिषदेसाठी प्रबळ दावेदार असलेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, पांडुरंग पवार, तसेच शिवसेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, मागील निवडणुकीत केवळ एकमताने पराभूत झालेले शिवसेनेचे मंगेश काकडे, आनंद रासकर, जीवन शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी केली होती या सर्वांचा मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.

नारायणगाव वारूळवाडी या गटासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी आरक्षण निघाल्यामुळे येथे नारायणगावचे विद्यमान सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे भाजपचे संतोष नाना खैरे राष्ट्रवादीचे सुजित खैरे हे उमेदवार कुणबी जातीचा दाखला असल्यामुळे येथून इच्छुक आहेत.
जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पुढील प्रमाणे
डिंगोरे – उदापूर (सर्वसाधारण), खामगाव-तांबे (सर्वसाधारण), पाडळी-येणेरे (सर्वसाधारण महिला), धालेवाडी तर्फे हवेली-सावरगाव (सर्वसाधारण महिला), ओतूर-उंब्रज (नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी), आळे-पिंपळवंडी (अनुसूचित जमाती महिला) राजुरी-बेल्हे (सर्वसाधारण महिला), बोरी बु.-खोडद(अनुसूचित जमाती महिला), नारायणगाव – वारूळवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी)

पंचायत समिती जुन्नर गणासाठी आरक्षण

धालेवाडी तर्फे हवेली – अनुसूचित जाती महिला
पाडळी – अनुसूचित जमाती महिला
आळे – अनुसूचित जमाती महिला
बोरी बुद्रुक – अनुसूचित जमाती पुरुष
बेल्हे – अनुसूचित जमाती पुरुष
पिंपळवंडी – ओबीसी पुरुष
सावरगाव – ओबीसी पुरुष
वारुळवाडी- ओबीसी महिला
उंब्रज नं.१ – ओबीसी महिला
राजुरी – सर्वसाधारण महिला
खोडद- सर्वसाधारण महिला
नारायणगाव – सर्वसाधारण महिला
डिंगोरे – सर्वसाधारण महिला
खामगाव- सर्वसाधारण
उदापुर – सर्वसाधारण
तांबे – सर्वसाधारण
येणेरे – सर्वसाधारण
ओतूर – सर्वसाधारण

Previous articleदौंड , शिरूर भागात विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी मामा टोळी जेरबंद
Next articleसंत शिरोमणी श्री सावतामाळी महाराज यांच्या ७२७ व्या पुण्यतिथी निमित्त अखिल माळी समाज संघाच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न