दौंड , शिरूर भागात विद्युत ट्रान्सफॉर्मर चोऱ्या करणारी मामा टोळी जेरबंद

योगेश राऊत,पाटस

गेल्या महिन्यात पारगाव येथील शहाजी रूपनवर यांचे शेतातील व युवराज बोत्रे यांचे शेतातील ट्रान्सफॉर्मर डीपी कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्ट्रक्चर वरून नट बोल्ट खोलून खाली पाडून त्यातील ऑइल सांडून नुकसान करून त्यातील अंदाजे एकूण २८० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत यवत पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होता .

यवत पोलीस स्टेशन चे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम , गुरुनाथ गायकवाड , अक्षय यादव , मारुती बाराते यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राहुरी जि . अहमदनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार मामा उर्फ़ मुक्तार गफ़ुर देशमुख रा . राहुरी जि . अहमदनगर हा त्याचे टोळीतील साथीदाराकडुन विद्युत ट्रान्सफार्मर डीपी चोरीचे गुन्हे करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरील पथकाने राहुरी परिसरात राहुरी पोलीस स्टेशनचे पो.कॉ नदीम शेख यांचे मदतीने राहुरी मुलन माथा या ठिकाणी वेषांतर करुन सापळा लावुन मामा उर्फ़ मुक्तार गफुर देशमुख , विशाल काशीद , अभिषेक मोरे सर्व रा राहुरी जि अहमदनगर यांना स्कॉरपिओ सह ताब्यात घेउन विचारपुस केली असता सदर संशयित इसमांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने पारगाव , कोरेगाव भिवर , मिरवडी मेमाणवाडी , करंदी , आपटी , डिग्रजवाडी , वाघाळे , भांबर्डे , गणेगाव खालसा , शिरुर , रांजणगाव , शिक्रापुर , यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ११ रोहित्र ( डीपी ) चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले असून त्यातील , अल्युमिनियम व तांब्याच्या तारा श्रीरामपूर येथील भंगार व्यावसायिक फिरोज रझाक शेख यास विक्री केल्याने त्यासही सदरगुन्हयाचे कामी ताब्यात घेण्यात आले असून सदर मामा ऊर्फ मुख्तार देशमुख टोळीकडून दौंड व शिरूर उपविभागातील ११ विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडुन एक काळ्या रंगाची स्कार्पिओ गाडी क्रं एम एच ४६ ओ ०२३२ , तसेच ११० किलो अल्युमिनियमच्या तारा , व ३५० किलो तांब्याच्या तारा , व तांब्याचे त्रिकोणी ठोकळे असा एकूण कि.रु ५,६७,७०० / – रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांच्याकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत असे ११ विद्युत ट्रान्सफार्मर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून त्यांचे साथीदार जयराम रामभाऊ तनपुरे , सागर शिवाजी काकुळदे , प्रवीण उर्फ पवन बेंजामान साळवे , सुजित टेम्बे सर्व रा . राहुरी जि . अहमदनगर हे फरार आहेत . आरोपी मामा उर्फ़ मुक्तार गफुर देशमुख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत . आरोपी अभिषेख गोरख मोरे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर अनेक गुन्हे दाखल आहेत .

सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख सो , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षकनारायण पवार , पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे , पो.हवा . निलेश कदम , पो.हवा . गुरू गायकवाड , पो.ना. अक्षय यादव , पो.ना. रामदास जगताप , पो.कॉ.मारुती बाराते , राहुरी पोलीस स्टेशनचे पो . कॉ . नदीम शेख , सायबर पोलिस स्टेशनचे पो.हवा . सचिन गायकवाड , पो.कॉ सुनिल कोळी , यांनी केलेली असुन पुढील तपास सहायक फौजदार सचिन जगताप , रमेश कदम हे करीत आहेत .

Previous articleशतकपूर्ती महोत्सवानिमित्त वृक्षारोपण ग्रामपंचायत कार्यालय, पाणी परीक्षण प्रयोगशाळा, नदी घाटाचे उद्घाटन, टपाल व भूमापन कार्यालयाचे स्थलांतर कार्यक्रम उत्साहात
Next articleजुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ९ गटाचे तर पंचायत समितीच्या १८ गणांचे आरक्षण जाहीर