उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या फलकाचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते अनावरण

उरुळी कांचन

आज जग फार पुढे गेले आहे, जगात विविध क्षेत्रात विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवे. त्यामुळे आवड असलेल्या क्षेत्रात आपल्याला करिअर करण्याची संधी मिळेल. उरुळी कांचन (ता.हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या शाळेचे नाव पोहोचवेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाचा फलक नामकरण अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्याचप्रमाणे इयत्ता दहावी व बारावी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरित करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार अशोक पवार, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे सचिव-विश्वस्त सोपान कांचन, खजिनदार-विश्वस्त राजाराम कांचन, विश्वस्त महादेव कांचन, संभाजी कांचन, राजेंद्र टिळेकर,
माजी संचालक प्रकाश म्हस्के, प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, सरपंच राजेंद्र कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, संचिता कांचन,प्राचार्य भारत भोसले, उपप्राचार्य किसन कोकाटे, सर्व पर्यवेक्षक वर्ग, शैक्षणिक संकुलातील प्रशासकीय वर्ग, अध्यापक, अध्यापिका, शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी सह सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्ताने जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधला. विद्यार्थी दशेत असताना आपल्या मनात किती वेगवेगळ्या कल्पना येतात याचा अनुभव या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना घेतला.

Previous articleसंत शिरोमणी श्री सावतामाळी महाराज यांच्या ७२७ व्या पुण्यतिथी निमित्त अखिल माळी समाज संघाच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
Next articleजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे -आयुष प्रसाद