नवीन अवघड क्षेत्रातील शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना बदलीची संधी द्या- गौतम कांबळे

दिनेश पवार: दौंड

अवघड क्षेत्रातील शाळेत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना बदलीची संधी द्या अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व उपसचिव तसेच प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की, ७ एप्रिल २०२१ च्या प्राथमिक शिक्षक बदली धोरणानुसार शिक्षक बदली प्रक्रिया सध्या सुरू आहे . यामध्ये शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०१७ नुसार तयार करण्यात आलेल्या अवघड क्षेत्रातील शाळा यादीतील प्राथमिक शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये संधी देण्यात आली आहे .परंतु ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या निकषानुसार अवघड क्षेत्राच्या याद्या सर्व जिल्हा परिषदेने तयार केलेल्या असूनही तिथे कार्यरत प्राथमिक शिक्षकांना बदलीची संधी देण्यात आलेली नाही . हा त्यांच्यावरील अन्याय आहे .

अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यापूर्वी तेथील परिस्थिती आजच्यापेक्षा कठीण होती . ” तेथे नंदनवन होते ,सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होत्या ” अशी काही परिस्थिती नव्हती.त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत गेल्या ,तरीही अवघड क्षेत्रातील शाळांनी शासनाने ठरवून दिलेले निकष पूर्ण केले आहेत .येथील शिक्षकांना कठीण परिस्थितीशी झगडत आपली सेवा करावी लागलेली आहे .त्यामुळे नवीन निकषाप्रमाणे घोषित केलेल्या अवघड क्षेत्रातील शाळांची परिस्थिती पूर्वीही आजच्यापेक्षा कठीण /अवघड होती ,याची राज्य शासनाने नोंद घ्यावी व या अवघड क्षेत्रातील शाळेत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्राचा लाभ देऊन निसर्गाने त्यांच्यावर केलेला अन्याय शासनाने दूर करावा अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे .मागील दोन वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत त्यामुळे अवघड क्षेत्रातील पूर्वींच्या शाळा व नवीन निकषानुसार अवघड क्षेत्रातील आता निश्चीत करण्यात आलेल्या शाळा या दोन्ही ठिकाणी कार्यरत प्राथमिक शिक्षकांना बदलीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे .

यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण ,इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे व महासचिव शशिकांत मखरे ,दौंड तालुकाध्यक्ष दुर्योधन चव्हाण व महासचिव विजय रणशृंगारे,बारामती तालुकाध्यक्ष विनोदकुमार भिसे व महासचिव सतीश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते .

Previous articleवाघोली येथील बी.जे.एस विद्यालयास जिल्हा स्तरीय ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार
Next articleसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न