संत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न

नारायणगाव : किरण वाजगे

श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७२ वा संजीवन समाधी सोहळा नारायणगाव (ता. जुन्नर) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्साहात पार पडला.

मंगळवार (दि.२६ ) रोजी मीना नदी तीरावरील संजीवन समाधी श्री हरिस्वामी मंदिर येथे सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत अभिषेक करण्यात आला. सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ह भ प स्वामिराज महाराज भिसे, पुणे विद्यापीठ, यांचे सुश्राव्य हरिकीर्तन उत्साहात पार पडले.

दुपारी एक ते अडीच वाजण्याच्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन ते सहा या वेळेत श्रीहरी स्वामी महिला भजनी मंडळाचा हरिभजनांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सर्व कार्यक्रमासाठी दिवसभर नारायणगाव व परिसरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री संत हरीस्वामी देवस्थान ट्रस्ट व नामदेव शिंपी समाज नारायणगाव तालुका जुन्नर यांनी केले.

Previous articleनवीन अवघड क्षेत्रातील शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना बदलीची संधी द्या- गौतम कांबळे
Next articleसंत शिरोमणी नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न