कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरणार :भारतीय मजदूर संघ

कुरकुंभ: सुुुरेेेेश बागल

विज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. वर्षानुवर्षे सातत्याने व नियमीतपणे कायम कामगारांच्या बरोबर ऊन वारा पाऊस, कोव्हीड महामारी मध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे कंत्राटी कामगारांचे रोजगार सुरक्षा, पगार, समान काम समान वेतन, कामा न घेणारे कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ रस्ता वर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा भारतीय मजदूर संघाचे विदर्भ प्रदेश महामंत्री मा श्री गजानन गटलेवार यांनी दि १६ जुलै २०२२ रोजी भारतीय मजदूर संघ प्रदेश कार्यालयात झालेल्या महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या नागपूर शहरातील झालेल्या कामगारांच्या मेळावा मध्ये अध्यक्षीय भाषणात दिलेला आहे.

विज ऊद्योग हा धोकादायक ऊद्योग समजला जातो, या ठिकाणी कंत्राटी कामगार अनेक वर्षे कार्यरत असुनही अल्प वेतन च मिळत आहे. नाम मात्र कंत्राटदारांकडुन कामगारांची विविध मार्गांनी पिळवणूकच केली जात आहे , आवश्यक ते शैक्षणिक प्रमाण पत्र, १२ ते १५ वर्षाचा अनुभव असतानाही कंत्राटदारा कडून काही कामगारांना पगार न देण्या बाबतीत कंत्राटदार कडून कामगारांना सांगितले जाते, या मध्ये कंत्राटदार चा ऊदेश काही वेगळा असावा जर पगार न मिळाल्यास संघटना आंदोलन सुरू करेल असे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे (संलग्न भारतीय मजदूर संघ) सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले आहे. या वेळी कंत्राटी कामगारांना रोजगारात सुरक्षा, समान काम समान वेतन करिता करत असलेले प्रयत्न, आंदोलने या बाबतीत ची सविस्तर माहिती दिली.

विदर्भ विभागातील कंत्राटी कामगारांचे महत्वपूर्ण प्रश्न, लक्षवेधी प्रश्नां बाबतीत, कंत्राटी कामगार कायद्यातील तरतूदी चां भंग करणारे करणारे संस्था वर कारवाई करावी, नागपूर मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत मा अप्पर कामगार आयुक्त नागपूर श्री पाटणकर साहेब यांना लेखी पत्र देवुन या बाबतीत वरिष्ठ पातळीवर त्रिपक्षीय बैठक आयोजित करून कामगारांना न्याय देण्यासाठी ची मागणी केली आहे यावेळी मा. श्री. पाटणकर साहेब यांनी लवकरच मिटींग आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

या मेळाव्यात भारतीय मजदूर संघ जिल्हा प्रमुख श्री ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र विज कामगार संघांचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री राकेश मथुरे ,उपाध्यक्ष योगेश सायवांकर , सचिव अभिजित माहुलकर , संघटन मंत्री श्री सुकेश गुरवे , कोषाध्यक्ष
समीर हांडे, सागर साबडे सह संघटनमंत्री विकी जावडे , यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमाजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यानंतर जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांचा धक्कादायक निर्णय
Next articleजिद्द ,चिकाटी अन् प्रामाणिक कष्टाच्या जोरावर शेतकऱ्यांचा मुलगा बनला ‘ सीए ; वाकी बु’ गावच्या शिरपेचात मानाचा तुरा