स्वच्छ उरुळी, सुंदर उरुळी ‘ हा वसा जपत स्वच्छता मोहिम राबवली : उरुळी कांचन ग्राम स्वच्छता ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

उरुळी कांचन

या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी विश्रांतीसाठी थांबत असतो. या सोहळ्यादरम्यान गावात ठिकठिकाणी कचरा झालेला होता. स्वच्छता आणि आरोग्याचा मंत्र देत ग्राम स्वच्छता दुतांनी पालखी मार्गावरील कचऱ्याची विल्हेवाट न लावता पुनर प्रकिया साठी सायरस पुनावाला टिम यांच्या कडे अंदाजे एक टनापर्यत प्लॅस्टिक पाण्याच्या बोटल देण्यात आल्या.

शनिवारी संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा विश्रांतीसाठी लाखो वारकऱ्यांसह थांबला होता. विसाव्या दरम्यान परिसरातील सेवाभावी संस्थांबरोबरच दानशूर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांना अल्पोपहार , जेवण, चहा, बिस्किटे आणि फळे इत्यादी दिल्यामुळे पालखी मार्ग व जागोजागी अस्वच्छता पसरली होती. चहाचे टाकून दिलेले कप, प्लॅस्टिक पिशव्या, केळीची सालं इ अस्ताव्यस्त पडलेले होते.चौकाचौकात खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने लावली होती . तेथे ही कचरा झालेला होता. पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर , रोगराई आणि घाणीचे साम्राज्य पसरु नये म्हणून समाजसेवेचा वसा घेतलेले, ‘स्वच्छता असे जेथे,आरोग्य वसे तेथे ‘ हे ब्रीवाक्य घेऊन उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुपचे ग्रामदुत यांनी अनेक सामाजिक संस्था यांना बरोबर घेऊन महा स्वच्छता अभियान राबविले.

या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभागी झालेले हवेली पत्रकार संघ, मा तंटामुक्ती अध्यक्ष उरुळी कांचन चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, व ग्रामपंचायत कर्मचारी, आदर पुनावाला क्लीन सिटी टीम, उरुळी कांचन परिसरातील विविध शाळांचे शिृक्षक व विद्यार्थी, एकता महिला बचत गटांचा समूह, निसर्गोपचार आश्रम चे सर्व कर्मचारी, स्वामी सेवा परिवार ट्रस्ट सोरतापवाडी,एकात्मिक बालविकास प्रकल्प, पोलीस चौकी उरुळी कांचन, मराठा महासंघ उरुळी कांचन साईनाथ मित्र मंडळ, व सर्व गणेश मंडळे, सर्व राजकीय पक्ष, मेडिकल असोसिएशन, कस्तुरी प्रतिष्ठान, व आदरणीय सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ. असे चारशे स्वच्छता दुतानी काही तासांतच पालखी मार्गाची स्वच्छता केली.
‘स्वच्छ उरुळी, सुंदर उरुळी ‘ हा वसा जपत स्वच्छता मोहिम राबवली. सदर उपक्रमास सह आयुक्त देसाई , लोणी काळभोर पोलीस स्टेशन राजेंद्र मोकाशी, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा अध्यक्ष वैशाली नागवडे, गटविकास अधिकारी प्रशांत शिके, ह्यांची सदिच्छा भेट कामाचे कौतुक करण्यात आले.

Previous articleग्रामीण भागात अद्ययावत आरोग्य सेवा मिळणार – विवेक वळसे पाटील
Next articleस्वच्छ उरुळी, सुंदर उरुळी ‘ हा वसा जपत स्वच्छता मोहिम राबवली; उरुळी कांचन ग्रामस्वच्छता गुप्रचा स्तुत्य उपक्रम