ग्रामीण भागात अद्ययावत आरोग्य सेवा मिळणार – विवेक वळसे पाटील

आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघात आरोग्य विभागातील ८२ नवीन पदभरतीस मंजुरी

शिंगवे प्राथमिक आरोग्य केंद्र -१५,तिरपाड प्राथमिक आरोग्य केंद्र -१५,ग्रामीण रुग्णालय, तळेघर- २६, ग्रामीण रुग्णालय, मलठण – २६, इत्यादी पदांना मंजुरी

निरगुडसर – शासन निर्णयान्वये, सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये नव्याने स्थापन करण्यात आलेल्या, आरोग्य संस्थांचे बांधकाम पुर्ण झालेल्या उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला असुन ७६ आरोग्य संस्थांकरीता एकूण ५०६ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच ६९९ मनुष्यबळ सेवा संख्येच्या‌ मर्यादेत बाह्ययंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करुन घेण्यास, आरोग्य संस्थांचे कामकाज सुरु करण्यास व नव्याने पदनिर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या मान्यता देण्यात आलेल्या आरोग्य संस्थेतील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर आंबेगाव-शिरुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगवे व तिरपाड व ग्रामीण रुग्णालय तळेघर (ता.आंबेगाव), मलठण (ता.शिरुर) येथील पदांचा समावेश आहे. आंबेगाव शिरुर तालुक्यातील आरोग्य संस्थांविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, गृहमंत्री मा.दिलीपराव वळसे पाटील, आरोग्य मंत्री मा.राजेशभैय्या टोपे, यांचेकडे विवेक वळसे पाटील यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

” महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत या पदनिर्मितीसाठी २३ जुलै रोजी मान्यता देण्यात आली आहे. या पदभरतीमुळे ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी इमारती सुसज्ज असून पदनिर्मितीस मान्यता मिळाल्यामुळे ग्रामस्थांना अद्ययावत आरोग्य सेवा मिळणार असल्याचे ” पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

Previous articleकोर्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
Next articleस्वच्छ उरुळी, सुंदर उरुळी ‘ हा वसा जपत स्वच्छता मोहिम राबवली : उरुळी कांचन ग्राम स्वच्छता ग्रुपचा स्तुत्य उपक्रम