‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात खाद्यभ्रमंती उत्साहात संपन्न

उरुळी कांचन

महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय उरुळी कांचन सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘खाद्य भ्रमंती’(Food Festival) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांनी केले. प्रमुख पाहुणे महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के.डी कांचन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ.आर.के.अडसूळ म्हणाले, विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन व्यवसायासाठी आवश्यक असणारी कौशल्ये समजून घ्यावीत व आपला व्यक्तिमत्व विकास साधावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. निलेश शितोळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. अमोल बोत्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिता भोर यांनी केले.या कार्यक्रमास प्रा. वैशाली चौधरी , प्रा. विद्या लालगे प्रा. शुभांगी रानवडे व प्रा. प्रणिता फडके उपस्थित होते.

या स्पर्धेत ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे परीक्षण डॉ.समीर आबनावे, प्रा.सुजाता गायकवाड , डॉ.अविनाश बोरकर, प्रा.प्रवीण नागवडे यांनी केले. या उपक्रमात प्रा.प्रदीप राजपूत, श्री. विशाल महाडिक व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Previous articleविलू पूनावाला फाऊंडेशनच्या मार्फत सोरतापवाडीत बसवला जागतिक दर्जाचा शुद्ध पाणी पुरवठा प्लांट
Next articleदेवदर्शन यात्रा समितीवतीने वसंतस्मृती सेवा सप्ताहाचे आयेजन