विलू पूनावाला फाऊंडेशनच्या मार्फत सोरतापवाडीत बसवला जागतिक दर्जाचा शुद्ध पाणी पुरवठा प्लांट

उरुळी कांचन

सोरतापवाडी येथे धनगर वस्ती, महादेव नगर, माळवाडी या ठिकाणी आदर पूनावाला यांच्या वतीने विलू पूनावाला फाऊंडेशन यांचे तर्फे आणि युवा उद्योजक अमित दादा चौधरी याच्या प्रयत्नातून मोफत जागतिक दर्जाचे शुद्ध पाणी पुरवठा प्लांट बसवण्यात आले. पुनावाला क्लीन सिटी चे सी.ओ.ओ.मल्हार करवंदे सर व समाज सेवक बाळासाहेब तुकाराम चौधरी तसेच सोरतपवाडी गावाच्या सरपंच संध्या अमित चौधरी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी गावातील पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस रामदास पंढरीनाथ चौधरी, पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष रंगनाथ रामचंद्र चोरघे व महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष सोनबा शिवाजी चौधरी, माजी उपसरपंच निलेश विठ्ठल खाटाटे, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया देवेंद्र चौधरी, पुनम नावनाथ आढाव, सनी चौधरी, सूरज पोपट चौधरी, विलास शंकर चौधरी, शशिकांत दशरथ भालेराव, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष प्रवीण चोरघे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleशरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित भजन स्पर्धेत नांदेड कारागृहातील बंदीजनांचा सहभाग
Next article‘पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात खाद्यभ्रमंती उत्साहात संपन्न