राष्ट्रसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने कासुडी॔ ते कवडीपाट टोलनाक्यापर्यंत एक्स्प्रेस हायवेवरील दोन वर्षांपासून दुर्लक्षित कामे ३-४ दिवसांत पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करणार – सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे

कुरकुंभ ,सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कासुडी॔ टोलनाका ते हवेली तालुक्यातील कवडीपाट टोलनाक्यापर्यंतच्या एक्स्प्रेस हायवेवरील दुभाजकावर- लोखंडी संरक्षण कठड्यावर भरपूर प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असल्याने दिवसा एक्स्प्रेस हायवेवरील लोकांना गाड्या दिसत नाही आणि शेतकरी लोक रस्ता क्रॉस करताना काटेरी झुडपामुळे गाड्यांचा अंदाज न आल्यामुळे शेतकरी लोकांचं अपघात झालेले आहेत,साईडपटयावर माती भरपूर प्रमाणात साचली आहे एक्स्प्रेस रस्त्यावर टप्याटप्यावर मोठेमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे सहजपूर, कुंजीरवाडी येथे मोठ्या अपघातात लोकांना जीव गमवावा लागला आहे .

तसेच काही ठिकाणी कॅनालवरील – ओढयावरील पुलांची संरक्षण कठडे तुटली असल्याने रात्रीच्या वेळी पुलावरून गाड्या कॅनालमध्ये – ओढ्यामध्ये पडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे वारंवार एक्स्प्रेस रस्त्यावर डांबर टाकून टाकून मध्यभागातील दुभाजकाची उंची कमी झाली आहे त्यामुळे या लेनवरून त्या लेनवर वाहणे जाऊन सारखेच मोठे मोठे अपघात घडून भरपूर लोकांचा जीव गेला आहे तर काही लोकांना कायमचेच अपंगत्व आले आहे संरक्षण कठड्याचया लोखंडी जाळ्या काही ठिकाणी तुटल्याने – वाकलेल्या अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी त्या दिसत नसल्याने मोठा अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव जाण्याची भिती आम्हाला वाटत आहे कासुडी॔ व कवडीपाट टोलनाक्यावर तर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे सम्पूर्ण रस्त्यांवर कचरा पडलेला आहे दोन्ही टोलनाक्यावर पत्राशेड तसेच असल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत .

तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी प्रशासनाने प्रलंबित असलेली कामे लवकरात लवकर एक्स्प्रेस हायवेवरील छोटी मोठी कामे ४-५ दिवसांत पूर्ण करावीत कारण ८-९ दिवसांनी या एक्स्प्रेस हायवेवरून राष्ट्रसंत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे तरीही प्रशासनाने लवकरात लवकर रस्त्यावरील दुर्लक्षित कामासाठी कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आहे तरीही लवकर ही कामे पूर्ण करावीत नाहीतर ४-५ दिवसांत कासुडी॔ टोलनाका येथे सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे आमरण उपोषण करणार आहे.

Previous articleकवठे येमाई येथे डॉ. उचाळे यांच्या जिवनज्योत हाॅस्पिटलमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स चे उद्घाटन
Next articleचौफूला येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन संपन्न , भीमथडीला साहित्याचा महापूर यावा; संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे प्रतिपादन