भोसे येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

चाकण- शाळा बालकांचे भावविश्व घडविते सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडण घडणीत शाळेचे अव्दितीय स्थान मान्य करावेच लागेल.विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो आणि शाळा ही विद्यार्थी मनाच्या आवाजाचा कानोसा आपल्या सर्वांच्या ही नकळत घेत असते,एवढेच नव्हे तर हीच शाळा त्याच्या स्पर्शासाठी आतुरलेली व आसुसलेली असते .आज शाळेचा पहिला दिवस आणि हाच तो क्षण की ज्या शाळेतील प्रत्येक वर्ग देखील तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे .प्रारंभ चैतन्यमय आणि उत्साहवर्धक झाल्यास शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाटचालीसाठी गती मिळते याच दृष्टीकोनातून आज भोसे मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहपूर्वक वातावरणात इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला .

शाळेच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश गवळी यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन करून आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प , नवीन पाठ्यपुस्तके शालेय साहित्य देऊन स्वागत केले .यावेळी शाळेचे प्राचार्य डॉ .सतीश गवळी ,शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा वैशाली तांबे , शिक्षक पालक संघ सदस्य ,शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व पालक उपस्थित होते .

Previous articleशिवचरित्र कथाकार ह. भ. प. बाजीराव महाराज बांगर यांनी नारायणगाव येथे सलग १२ तास २० मिनिट केले रेकॉर्डब्रेक किर्तन
Next articleलांडेवाडी पिंगळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रोहीदास पिंगळे यांची बिनविरोध निवड