NSSE परीक्षेत घोडेगावच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

घोडेगाव – नोबेल एज्युकेशनल अँड सोशल इन्स्टिट्यूट, सातारा आयोजित ‘नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन’ NSSE या स्पर्धा परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये घोडेगावच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सहा विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या NSSE परीक्षेमध्ये विद्यालयाचे एकूण ७३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.त्यापैकी ६विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकले. कु. सत्यम मोहन वाघमारे हा इयत्ता चौथी चा विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवून राज्यात प्रथम आला.

इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कु. अनुष्का वसंत लांघी( १८२/२००)हिने आठवा क्रमांक, इयत्ता दुसरी मधील विद्यार्थिनी कु. मृण्मयी अभिमन्यू भुजबळ(१८४/२००) हिने नववा क्रमांक, इयत्ता सातवीतील कु. सानिका अमोल इंगवले( १७६/२००)हिने दहावा क्रमांक,इयत्ता तिसरीतील कु. समृद्धी दत्तात्रय डुकरे(१७८/२००)हिने अकरावा क्रमांक तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. रिया योगेश वाघमारे(१७४/२००) हिने चौदावा क्रमांक पटकाविला.

हि परीक्षा एप्रिल-2022 मध्ये आयोजित केलेली होती.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्राचार्या श्रीमती. मेरिफ्लोरा डिसोझा मॅडम तसेच उपप्राचार्या श्रीमती. रेखा आवारी मॅडम यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे, पालकांचेही अभिनंदन केले._

शाळेत दरवर्षी नवनवीन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणा-या उपक्रमांचे, स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करायचे असेल, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घ्यावा, असे प्राचार्यांनी यावेळी सांगितले.

Previous articleखेड सेझ प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न लागला मार्गी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला अखेर यश
Next articleसोन्याचे दागिने व ४५ मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद