भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निमंत्रण

राजगुरुनगर – येथे होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना राजभवन पुणे येथे नुकतेच देण्यात आले.१५ ऑगस्ट २०२२ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने हे वर्ष देशात स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती खेड तालुका यांच्या वतीने हुतात्मा राजगुरू जयंती दि २४ ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील क्रांतिकारक ,हुतात्मे यांचे वारस ,राज्य सरकारचे मंत्री ,जिल्ह्यातील खासदार, आमदार ,प्रशासकीय अधिकारी ,देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

याकामी समितीच्या वतीने नुकतेच आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या सहकार्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब,खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या भेटी घेण्यात आल्या आहेत, तसेच मंत्रालय मुंबई येथे भेट देण्यात आली.

पुणे येथे या भेटीच्या वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती खेड यांच्या वतीने हुतात्मा राजगुरू प्रतिमा, हुतात्मा राजगुरू चरित्र तसेच शाल ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास येण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

यावेळी भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समितीचे सल्लागार हुतात्मा राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू,हर्षवर्धन राजगुरू समन्वयक ,मधुकर गिलबिले गुरुजी,आनंद गावडे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होणे कामी खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू प्रेमी संस्था ,संघटना ,व्यक्ती यांची भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती गठीत करण्यात आली आहे,अशी माहिती समन्वयक मधुकर गिलबिले गुरुजी यांनी दिली.

Previous articleट्रान्सफॉर्मर चोरणारी टोळी जेरबंद
Next articleदेवळांचा धर्म, आणि धर्माची देवळें हे पुस्तक देऊन उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत-विशाल शेलार यांचा स्तुत्य उपक्रम