खेड तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी आत्माराम डुंबरे पाटील यांची निवड

राजगुरूनगर – महाराष्ट्रराज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हा मेळावा व मार्गदर्शन शबीर तसेच खेड तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी दावडी गावचे आदर्श पोलीस पाटील आत्माराम भाऊसाहेब डुंबरे पाटील यांची सनद व पद्ग्रहनाचा व कार्यकारणीची निवड करून सनद वाटप करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते,महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटिल यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून आरती करण्यात आली.यावेळी पोलीस पाटील संघ खेड तालुकाच्या वतीने मान्यवरांचा ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला .खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते वाढदिवस साजरा करण्यात आला.यानंतर पोलीस पाटील यांच्या असणाऱ्या मागण्या व वय वाढविणे,मानधन वाढ,पोलीस पाटलांना मिळणारा पुरस्कार शासनाकडून चालू करणे,रिनिव्हल थांबविने ह्या मागण्या अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी गृहमंत्री यांच्या कडे केल्या.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पोलीस पाटलांसाठी सभागृहात देण्याचे आश्वासन देण्यात आले.यानंतर ना गृहमंत्री दिलीपराव वळसे यांनी सांगितले गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास महत्त्वाचा घटक आहे.करोनाच्या काळात पोलीस पाटलांनी उल्लेखनीय बद्दल अभिनंदन केले.व पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाला आदेश देण्यात आले आहे व उर्वरित पोलीस पाटील रिक्त जागा लवकरच भरण्यात येईल व बाकीच्या मागण्यासाठी चर्चा करण्यासाठी लवकरच गृह मंत्रालयात पोलीस पाटील पदाधिकारी सोबत मिटिंग लावण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

यावेळी  पुणे जिल्हा पोलीस पाटील अध्यक्ष साहेबराव राळे पाटील,महिला पुणे जिल्हा महिला अध्यक्ष हर्षदा संकपाल, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष तृप्ती मांडेकर,कमलाकर मांगले राज्य सचिव, महाजन पाटील राज्य उपाध्यक्ष, दळवी पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष,दादा काळभोर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, निळकंठ थोरात पश्चिम महाराष्ट्र खजिनदार, नवनाथ धुमाळ संघटक महाराष्ट्र राज्य,व राज्य पोलीस पाटील पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकावळ पिंपरी येथील रोहिदास पाबळे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
Next articleगेली २५ वर्षे नोकरी व व्यवसायानिमित्त हरवलेली पाखरे स्नेह मेळाव्यानिमत्त पुन्हा आली एकञ