श्री स्वामी समर्थ गुरुपीठाची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची मागणी

दिनेश पवार – दौंड

श्री स्वामी समर्थ गुरुपीठाची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर कडक स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दौंड शिवराज नगर येथील सेवाकऱ्यांनी दौंड पोलीस स्टेशन ला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, याबाबत दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना सेवाकऱ्यांनी निवेदन दिले आहे.

नाशिक येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठाची बेकायदेशीरपणे कोणतेही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप अमर पाटील व चंद्रकांत पाठक हे करत असून यामुळे सेवेकरी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने खोटे आरोप करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.

श्री स्वामी समर्थ गुरुपीठाद्वारे सर्व सेवेकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच बालसंस्कार,युवा संस्कार तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन असे उपक्रम राबवले जातात ज्याद्वारे लक्षावधी सेवेकरी याचा लाभ घेतात असे असताना देखील विनाकारण बेकायदेशीरपणे गुरुपीठाची बदनामी केली जाते असे कृत्य करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी दौंड केंद्रातील मोठ्या संख्येने सेवेकरी उपस्थित होते

Previous articleमराठा समाजातील तरुणांनी पारंपरिक शेतीबरोबरच उद्योग व्यवसायात उतरावे – राजेंद्र कोंढरे
Next articleमोरोशीच्या भैरवगडावरून अहिल्यादेवींना वंदन