मराठा समाजातील तरुणांनी पारंपरिक शेतीबरोबरच उद्योग व्यवसायात उतरावे – राजेंद्र कोंढरे

उरुळी कांचन

मराठा समाजातील तरुणांनी बदलत्या जगाचे भान ठेवून पारंपरिक शेतीबरोबरच उद्योग व्यवसायात उतरावे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सोरतापवाडी तालुका हवेली येथे बोलताना केले.

सोरतापवाडी तालुका हवेली येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांचे संयुक्त विद्यमाने स्वयम् रोजगार व शासकीय कर्ज योजना मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की मराठा तरुणांनी केवळ राजकीय पदाच्या अपेक्षेने राजकारणाच्या मृगजळात वेळ वाया न घालवता राजसत्तेबरोबरच अर्थ सत्तेवर वर्चस्व निर्माण करावे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कर्ज मिळवावे व उत्कृष्ट आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करावा व कर्जाची वेळेत परतफेड करून व्यावसायिक जगात मराठा समाजाची पत निर्माण करावी.

मेळाव्याचे उद्घाटन सोरतापवाडी गावचे आदर्श सरपंच सुदर्शन चौधरी व महालक्ष्मी एव्हिएशन व डेव्हलपर्सचे संचालक दत्तात्रय गोते यांचे हस्ते करण्यात आले. तर तरुणांनी व्यवसाय कसा करावा याचे मार्गदर्शन युवा उद्योजक माणिक मोबाईल चे संचालक शेखर उंद्रे पाटील यांनी केले. यावेळी मराठा महासंघाचे पुणे शहराध्यक्ष गुलाब गायकवाड, जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे, अण्णासाहेब पाटील महामंडळा चे जिल्हा समन्वयक संकेत लोहार, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक खालील हवालदार यांनी उपस्थितांना उद्योग व्यवसाय व कर्ज योजना विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी हवेली तालुका मराठा महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी दादासाहेब भोंडवे यांची फेरनिवड करण्यात आली. तर तालुका महिला अध्यक्षपदी लता हरगुडे व युवक अध्यक्षपदी सचिन माथेफोड व युवती अध्यक्षपदी पूजा सणस यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला पुणे शहर कार्याध्यक्ष अमर पवार, सरचिटणीस गणेश मापारी, महिला जिल्हाध्यक्ष शैलजा दुर्गे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष स्वाती बेंद्रे, पुणे शहर सरचिटणीस भाग्यश्री बोरकर, उपसरपंच भाऊसाहेब चौधरी, हडपसर विधानसभा अध्यक्ष संगीता पाटील, पुणे शहर उपाध्यक्ष मिलन पवार, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष वर्षा काळे, जिल्हा युवक कार्याध्यक्ष अविनाश जाधव, लोणी काळभोर च्या सरपंच माधुरी काळभोर, तालुका अध्यक्ष दादासाहेब भोंडवे, महिला तालुकाध्यक्ष नंदिनी मुरकुटे, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत कोतवाल, संघटक सुनील तुपे, उपाध्यक्ष राहुल शिंदे, महिला उपाध्यक्ष सुरेखा कांचन, स्वाती चौधरी, आदेश तुपे, अमित तुपे, चार्टर्ड अकाउंटंट अक्षय कदम आदी मान्यवर व विविध बँकांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleदौंड तालुक्यात “शिव संपर्क” अभियानाला सुरवात ; खासदार कृपाल तुमाने यांनी घेतली प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
Next articleश्री स्वामी समर्थ गुरुपीठाची बदनामी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईची मागणी