चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 22 प्रवाशांचे प्राण; शिंदवणे घाटातील घटना

उरुळी कांचन

सकाळी सात वाजता सासवडहून उरुळी कांचन कडे निघालेल्या पीएमपीएल बस मध्ये 22 प्रवासी घेऊन बस शिंदवणे घाटातून उरळीकांचन च्या दिशेने निघाली असता शिंदवणे घाटातील मंदिराजवळ बसचे तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याचे चालक किशोर कदम यांच्या लक्षात आले. चालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन ठिकाणच्या वळणाहून गाडी पुढे गेली व बाजूला असलेल्या डोंगराच्या बाजुला धडकऊन थांबवली यामुळे 22 प्रवाशांचे प्राण असल्याने प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. यामध्ये एकाही प्रवाशाला कोणतीही दुखापत झाली नाही. चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर बावीस प्रवाशांसोबत बस दरीत कोसळली असती.

खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप,आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून तसेच पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे , माजी सनदी अधिकारी संभाजीराव शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे सासवड शिंदवणे घाट मार्गे उरुळी कांचन अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने 22 प्रवाशांचे प्राण वाचल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनीही चालकाचे आभार मानले.

Previous articleहवेली तालुका कृषी विभागाच्यावतीने महिलांसाठी मूल्य वर्धित प्रक्रिया उद्योग उभारणी व व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण
Next articleअल्प दरात रुग्णांना सेवा देणारे डॉ.रवींद्र भोळे यांना भारतरत्न डॉ ए पी जे कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर