राष्टवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या शहरध्यापदी धनराज टिळेकर तर किसान सेलच्या शहराध्यपदी रोहिदास मुरकुटे यांची निवड

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलच्या शहर अध्यक्षपदी रोहिदास मुरकुटे तर राष्ट्रवादी काँग्रेस धनराज टिळेकर ओबीसी सेलच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदरची निवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामदास तुपे यांनी केली.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे विवेक पाटील, तालुका युवक सरचिटणीस प्रसाद कांचन, विकी चव्हाण आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेचे विचार सर्व सामान्य नागरिकांन पर्यंत पोचविण्यासाठी आगामी काळात सर्वांना बरोबर घेऊन करणार असल्याचे टिळेकर मुरकुटे यांनी सांगितले.

Previous articleकायद्याचा आदर करणार नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करू- एपीआय किरण भालेकर
Next articleराष्ट्रवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या शहरध्यापदी धनराज टिळेकर तर किसान सेलच्या शहराध्यपदी रोहिदास मुरकुटे यांची निवड