कायद्याचा आदर करणार नाही त्याच्यावर गुन्हा दाखल करू- एपीआय किरण भालेकर

घोडेगाव – आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांना निर्भया पथकांबाबत जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.किरण भालेकर यांनी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास,व्यासंग, वाचन,करिअर,नोकरी यावर लक्ष केंद्रित करावे. एकमेकांची छेडछाड,टिंगल,टवाळी करून कायद्याच्या कचाट्यात सापडू नये. त्यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित नाही.आपले करिअर आणि आई वडिलांची स्वप्नपूर्ती साकार करावी.गैरमार्गाचा अवलंब करू नये.एकमेकांचा आदर करावा.चित्रपटांच्या आभासी दुनियेत विद्यार्थ्यांनी वावरू नये. आभासी दुनियेचे अनुकरण करू नये.चित्रपटाकडे मनोरंजन आणि प्रबोधनाच्या भूमिकेतूनच पाहावे. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या प्रसंगी पो.काॕ. माणिकराव मुळूक, श्री.डेंगळे, प्रा.पोपटराव माने,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव यांनी केले. उपप्राचार्य प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी आभार मानले.

Previous articleबाबा हरदेव सिंह जी महाराज यांना समर्पित – समर्पण दिवस
Next articleराष्टवादी कॉग्रेस ओबीसी सेलच्या शहरध्यापदी धनराज टिळेकर तर किसान सेलच्या शहराध्यपदी रोहिदास मुरकुटे यांची निवड