युवकांनी व्यसनापासून दूर राहवे – पै.अनिकेत घुले

पवनानगर -महाराष्ट्र भर द आर्ट आँफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून व परम पुज्य रविशंकर जी यांच्या संकल्पनेतुन व पैलवान अनिकेत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भर युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत मावळ,तळेगांव, सातारा, दौंड, नाशिक, शिर्डी,इंदापूर, या भागांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे हजारो युवकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता.यामधील सुमारे तीनशे युवक व्यसनापासून दूर झाले आहे.

यावेळी बोलताना अनिकेत घुले यांनी सांगितले की व्यसनामुळे अनेक संसार उघड्यावर आले आहे तर अनेक तरुण कमी वयामध्ये आपल्या तुन निघून गेले आहे. यामुळे कौटुंबिक वाद मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत मी संपूर्ण महाराष्ट्र भर युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असुन यामध्ये हजारो युवक सहभाग घेत आहे.यापुढे संपूर्ण महाराष्ट्रात हे शिबीर राबवणार असल्याचे घुले यांनी सांगितले आहे.

Previous articleचाकणमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या “साहित्य गौरव “पुरस्कारांचे वितरण
Next articleतमाशाचे महिन्याभराचे पैसे घेवून व्यवस्थापक फरार