चाकणमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या “साहित्य गौरव “पुरस्कारांचे वितरण

चाकण – येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचा साहित्य गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिवाजी विद्या मंदिर चाकण येथे संपन्न झाला.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, म. सा. प.पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे,बोरिवली नायब तहसिलदार कवयत्री अनुराधा माने ,म.सा.प.चाकण कार्यवाह डॉ.विजय गोकुळे, अध्यक्ष मधुकर गिलबिले ,उपाध्यक्ष ऍड.प्रीतम शिंदे,सहकार्यवाह डॉ.निलेश झगडे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले.

२०२१ मध्ये प्रकाशित झालेले कविता संग्रह,कादंबरी, कथा संग्रह शाखेच्या वतीने पुरस्कारासाठी मागवण्यात आले होते,त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.यातून महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून नऊ साहित्यिक यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली होती.

पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिछत्रपती साहित्य गौरव पुरस्कार अभिषेक नाशिककर नाशिक (समांतर) संत तुकाराम महाराज साहित्य गौरव पुरस्कार सौ.उषा हिंगो नेकर जळगाव ( धगधगते तळघर)संत गाडगे बाबा साहित्य गौरव पुरस्कार सिराज करीन शिकलगार सांगली (गझल चांद )संत संताजी महाराज जगनाडे साहित्य गौरव पुरस्कार चकोर शहा मुंबई (दोसतार) सावता भक्त भिकुजी भुजबळ साहित्य गौरव पुरस्कार दयाराम पाडलोसकर गोवा (बवाळ) याशिवाय स्व.सुनील नाना पानसरे स्मृती पुरस्कार सुहास बोबडे कराड (मराठी कविता परंपरा व प्रवाह) स्व.प्रकाश बनसोडे स्मृती पुरस्कार नाझिम शेख आळंदी (क्षमाशीलता) स्व.मारुती गोकुळे गुरुजी स्मृती पुरस्कार रावसाहेब जाधव(गरगर मोळ्या)स्व.रामदास शिंदे गुरुजी स्मृती पुरस्कार सौ.रश्मी गुजराथी पुणे (जाणीव) यांचा यावेळी सन्मानचिन्ह रोख रक्कम हुतात्मा राजगुरू चरित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ सदानंद मोरे यांनी चाकणचा साहित्यिक व ऐतिहासिक वारसा सांगितला,राजन लाखे यांनी साहित्य चळवळ ग्रामीण भागात वाढणे कामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

पुरस्कार वितरण सोहळा झाल्यावर कवयत्री अनुराधा माने यांच्या अध्यक्षतेखाली खुले कवी संमेलन झाले .यात अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या,सर्व कवींना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.नामदेव गायकवाड यांच्या ” भटकंतीच्या पाऊल खुणा” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी देहू म. सा. प.कार्यवाह डॉ.विवेकानंद मोरे, मजी शिक्षण संचालक शशिकांत हिंगोनेकर, माजी शिक्षण अधिकारी सिद्धार्थ चव्हाण ,शिक्षक संघटना अध्यक्ष नारायण करपे,मनोहर मोहरे,आनंद गावडे, शशिकांत शिंदे म.सा.प.चाकण शाखा संचालक डॉ.रोहिणी गव्हाणे,महेंद्र गाडे,चंद्रकांत गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रम संयोजन म. सा. प.चाकण शाखा सर्व संचालक, सदस्य यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.दिगंबर ढोकले ,संतोष गाढवे यांनी केले.आभार डॉ.रोहिणी गव्हाणे यांनी मानले.

Previous articleकवठे यमाई येथे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
Next articleयुवकांनी व्यसनापासून दूर राहवे – पै.अनिकेत घुले