पाटस येथे खेळताना दोरीचा गळफास लागून आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

योगेश राऊत ,पाटस

बहिण-भाऊ दोरीसोबत खेळत असताना दोरीचा गळ्याला फास लागून आठ वर्षाच्या बहिणीचा गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना पाटस (ता. दौंड) येथे शनिवारी (ता. ०७) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कु. राधिका राजू आरुण (वय ८ वर्ष, सध्या रा. गारफाटा पाटस, मुळ रा. पुणे) असे गळफास लागून मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका व तिचा भाऊ रुद्राक्ष हे चिकूच्या बागेमध्ये खेळत होते. तर त्या मुलांचे आईवडील हे त्याच बागेत काही अंतरावर काम करीत होते. खेळत असताना दोरीचा फास राधिकाच्या गळ्याला लागला त्यामुळे ओरडू लागली. राधिका ओरडू लागल्याने रुद्राक्ष हा तातडीने आई-वडील ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी ओरडत गेला. यावेळी आई वडील व इतर कामगारांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता राधिकाच्या तोंडातून फेस आलेला दिसून आला.

दरम्यान, आई वडील व उपस्थित नागरिकांनी राधिकाला त्वरित पाटस येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील तपास पाटस पोलीस करीत आहेत.

Previous articleनिघोज येथे स्व. अनांदा वराळ व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये खडकी पिंपळगाव संघ विजेता.
Next articleकवठे यमाई येथे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न