कवठे यमाई येथे माजी खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

धनंजय साळवे ,कवठे येमाई –  मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रामविजय फाऊंडेशन,समस्थ ग्रामस्थ कवठे व पं.समितीसदस्य डॉ.सुभाष पोकळे यांंच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी या शिबिराला शिवसेना कार्यकर्ते व ग्रामस्थांंनी चांगला प्रतिसाद  दिला.ह्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पं.सदस्य डाॅ.सुभाष पोकळे व  सरपंच रामदास सांडभोर यांनी केले .

या प्रसंगी डॉ. हमंत पवार, मा् ग्रा.सदस्य दिनकर घोडे, वि.का.सोसायटी चेअरमन विक्रम ईचके,मा.सरपंच रितेश शहा,ग्रा.सदस्य, बाळशीराम मुंजाळ,ग्रा.सदस्य पांडुरंग भोर,युवा नेते अविनाश पोकळे,सा.का.मारुती वागदरे,सोपान मुखेकर,हौशिराम मुखेकर, सांडभोरशेठ, विठ्ठल घोडे, शिरुर ता.रेशन संघटना सचिव गणेश रत्नपारखी, येस क्लब अध्यक्ष नवनाथ सांडभोर उपाध्यक्ष डॉ.संतोष उचाळे,मा.पं सदस्या डॉ.कल्पनाताई पोकळे ,दत्ताशेठ पडवळ,राजु मुजाळ, ई. मान्यवर उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाचे संयोजन ग्रा.सदस्य राजु इचके, ग्रा.सदस्य मधुकर रोकडे,मा.उपसरपंच निखिल घोडे,ग्रा.सदस्य सचिन बोर्हाडे,  उपसरपंच  विठठल मुंजाळ,युवानेते अभीजित सांडभोर,युवानेते सुनिलभैय्या वागदरे,युवानेते सुदर्शन भैय्या वागदरे,प्रसिद्ध गाडामालक बाबुशेठ खाडे,संतोष भाईक,अमोल पोकळे ह्यांनी केले होते.

रक्तदान शिबिराला तरुण कार्यकर्त्यांबरोबर महिलांचीही उपस्थिती लक्षणिय होती.ह्या शिबिराचला पुणे ब्लड सेंटर या संस्थेने रक्त संकलन करण्यासाठी मदत केली.

या प्रसंगी डॉ. सुभाष पोकळे यांनी शिवाजी आढळरावदादांच्या वाढदिवसा निमित्त रामविजय फाऊंडेशन व युवासेना दरवर्षी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असते व यापुढही दरवर्षी समाजपोयोगी अनेक कार्यक्रम राबवतील .समाज व गोरगरीब जनतेसाठी अविरत कामे करण्याची जबाबदारी रामविजय फाऊंडेशन,युवासेना व शिवसेना नेहमी घेत राहील.

Previous articleपाटस येथे खेळताना दोरीचा गळफास लागून आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
Next articleचाकणमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या “साहित्य गौरव “पुरस्कारांचे वितरण