निघोज येथे स्व. अनांदा वराळ व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये खडकी पिंपळगाव संघ विजेता.

 धनंजय साळवे ,कवठे येमाई – निघोज येथे  स्व.अनांदा कोंडीबा वराळ यांच्या स्मरणार्थ व्हॉलीबॉल स्पर्धा पर पडल्या. ह्या स्पर्धेमध्ये खडकी पिंपळगाव संघाने विजेतेपद मिळवले.ह्या स्पर्धेसाठी पारनेर तालुका व्हॉलीबॉलअध्यक्ष रावसाहेब दादा वराळपाटील,पारनेर तालुका व्हॉलीबॉल सचिव सुधीरभाऊ वाखारेपाटील,कन्हय्या उद्योग समूह  व निघोज व्हॉलीबॉल संघाने शिस्तबद्ध सुरेख नियोजन केले होते.ह्या स्पर्धेमध्ये पारनेर शिरूर संगमनेर हवेली आंबेगाव भोसरी ह्या परिसरातील सोळा संघांनी भाग घेतला

सप्रेसर,सागरभाऊ,विजय बगाटे,अलताफभाई,गहिनी बीडकर,मंगेश सोमासे,गणेश वळशे,पिंटु सरडे,संदीप लंके,सागर शेळके,कडू पाटील, बाबु हांडे,हनुमंत भोसले,डॉ.बारकु,मंदिलकर, तानाजी विश्वासराव  ई. नावाजलेल्या खेळाडूंचा खेळ पाहीला भेटला.

ह्या स्पर्धेत प्रथक क्रमांक -खडकी पिंपळगाव,द्वितीय क्रमांक-निघोजअ,तृत्तीय  क्रमांक- निघोज ब,चतुर्थ क्रमांक- उंब्रज, मिळविले.

 ह्या स्पर्धेसाठी शिरूर तालुका व्हॉलीबॉलअध्यक्ष बाबाजीशेठ गावडे,मा.अध्यक्ष आनंदराव फडतरे मामा, शिरूर तालुका व्हॉलीबॉल सचिव अमोल शेठ शिंदे, शिरूर तालुका राष्ट्रवादी चिटणीस पवनराजे जाधव,युवा नेते चेअरमन विठ्ठलजाधव,शिरूर तालुका व्हॉलीबॉल उपअध्यक्ष सोमनाथ तात्या सायकर हे उपस्थित होते.

Previous articleनिधन वार्ता – सुशिलाबाई भागवत यांचे वृद्धापकाळाने निधन
Next articleपाटस येथे खेळताना दोरीचा गळफास लागून आठ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू