दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा

कुरकुंभ , सुरेश बागल

दौंड शहरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना आजारामुळे सलग दोन वर्षे कोणताही सण साजरा करता आला नाही कोरोना आजार संपुष्टात आल्यामुळे सरकारने कार्यक्रम, यात्रा,आणि सण साजरा करण्यासाठी परवानगी दिल्यामुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे आहे.

दौंड शहरात ईद निमीत्त ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देण्यात आल्या आणि मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्ताने सर्व उपस्थित नागरिकांना मोठ्या उत्साहाने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,बारामती लोकसभा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष लहुअण्णा निवगुणे, तालुका अध्यक्ष विठ्ठल खराडे, पर्यावरण कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तन्मय पवार, शहराध्यक्ष हरेष ओझा, युवक तालुका अध्यक्ष श्रेयस मुनोत, अल्पसंख्यक शहराध्यक्ष रज्जाक भाई शेख, अल्पसंख्यक उपाध्यक्ष सुरेश क्षिरसागर,शहर सरचिटणीस विठ्ठल शिपलकर,अतुल जगदाळे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्येक्रमाचे आयोजन दौंड शहर अल्पसंख्यक कॉंग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आले.

Previous articleजि.प. शाळांमध्ये चांगल्या सुविधा देत गुणवान विद्यार्थी घडवा- राज्यमंत्री कु.अदिती तटकरे
Next articleन्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा गुन्हे दाखल करणार- पोलीस निरीक्षक नारायण पवार