भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी फड रंगला

कुरकुंभ , सुरेश बागल

पांढरेवाडी ( ता.दौंड ) येथे सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत काळभैरवनाथ यात्रा उत्साहात पार पडली. सलग दोन वर्षे कोरोना आजारामुळे व सरकारी नियमामुळे लॉक डाउन असल्याकारणामुळे यात्रा होऊ शकली नाही या वर्षी सरकारने यात्रेला परवानगी दिल्यामुळे पांढरेवाडी येथील काळ भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भैरवनाथाची पूजा करून रात्री देवाचा छबिना व मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीने ग्रामस्थ मोठ्या आनंदाने व उत्साहाने कार्यक्रमाला उपस्थित राहुन  कार्यक्रम पार पाडण्याचे काम केले . पालखी मंदिरात जो पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तमाशाचा कार्यक्रम चालू होत नाही पालखी साडेनऊ वाजता पोहोचल्यानंतर रात्री दहा वाजता लोकनाट्य तमाशा नांदवलकर यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शुक्रवार दिनांक २९ रोजी सकाळी हजेरी लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला आणि दुपारी कुस्त्यांच्या जंगी मैदान आकडा भरलेला होता.  महाराष्ट्रातून नावाजलेल्या पैलवानांनी उपस्थित दाखवल्यामुळे व उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला शोभा वाढवण्याचे काम केले. पांढरेवाडीतील ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीच्या वतीने उपमहाराष्ट्र केसरी बनकर यांना घोड्यावर बसून मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करण्यात आला.

कुस्ती जिंकून जो पैलवान विजयी होईल त्याला चांगल्या स्वरूपात बक्षीस देण्यात येत होते १०० रुपयांपासून ते ७५ हजार रुपयापर्यंत बक्षीस देण्यात आले.

यावेळी माजी आमदार रमेश आप्पा थोरात, दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे, यात्रा कमिटीचे प्रमुख राजेंद्र बापू कोंडे, पांढरेवाडी चे पोलीस पाटील विलास येचकर ,स्वप्निल शितोळे , सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलंगे, नानासो  झगडे ,सुरेश निंबाळकर ,अनिल झगडे, माजी उपसरपंच नितीन जाधव आणि यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौंड तालुक्यातील पांढरवाडी गावातील कुस्त्यांचा आखाडा खरोखरच बघण्यासारखा असतो तालुक्यातील अन्य गावातून कुस्त्यांचा आखाडा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली असते .

शारदानगर लोकवस्तीतील स्वइच्छेने सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलंगे यांनी वर्गणी गोळा करून भैरवनाथ यात्रा कमिटीला सहकार्य करण्याचे काम केले.

Previous articleमरकळ औद्योगिक नगरीमध्ये कामगार व महाराष्ट्र दिन ‘रक्तदान’ शिबीराने संपन्न
Next articleमरकळ औद्योगिक नगरीमध्ये कामगार व महाराष्ट्र दिन ‘रक्तदान’ शिबीराने संपन्न