मरकळ औद्योगिक नगरीमध्ये कामगार व महाराष्ट्र दिन ‘रक्तदान’ शिबीराने संपन्न

गणेश सातव , वाघोली

मरकळ औद्योगिक नगरीमध्ये कामगार व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन मरकळ इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी मनीष कोटक,राकेश मित्तल,गौरव शहा,पशुपतीनाथ चौबे, शैलेंद्र मिश्रा व नवीन करनांनी उपस्थित होते.कामगारांनी उस्फुर्तपणे रक्तदान करून कामगार व महाराष्ट्र दिन साजरा केला.

यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व टोपी भेटवस्तू स्वरूपात देण्यात आली. एकूण २३५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी समीर शेळके,अतुल कोतवाल,वैभव ढोकले,राजू थोरवे,सागर चौधरी,पद्माकर कवडे व
सुनील जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर शिबीरामध्ये मास फ्लॅज इंडिया .प्रा .लि., मॊज्ज इंजिनीरिंग प्रा. लि, डायनक्सल इंजिनिर्स प्रा. लि, वॉलमेंट टेकनॉलॉजी प्रा. लि, वर्षा फोर्जिंग प्रा. लि, क्लीनएज प्रॉडक्ट प्रा. लि, रविन केबल्स लि, रिशी लेजर लि, एम. इ. एनर्जी.प्रा .लि, हिंदुस्थान प्रेसिंग प्रा .लि, डेक्कन न्यूट्रा. प्रा. लि, क्यू टॉर्क प्रा. लि व क्लोराईड मेटल्स लि. या कंपन्यांनी सहभाग घेतला.

रक्तदानाचे महत्व तेव्हाच कळते जेव्हा आपल्या जवळच्या माणसांना गरज पडते. म्हणूनच आज आपण सर्वानी रक्तदान करून मानवतावादी सामाजिक दायित्व जपले आहे,असे म्हणून असोसिएशनचे सचिव किशोर कोंढाळकर यांनी सर्व रक्तदाताचे आभार मानले.

Previous articleमशिदी समोर हनुमान चालीसा पठण न करता सर्वधर्मीयांसमवेत मारुती मंदिरासमोर केली महाआरती – आ. अतुल बेनके
Next articleभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी फड रंगला