पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी १०६ हुतात्म्यांना व कामगारांच्या कार्याला “तैल बैला”वर तिरंगा फडकावून केला सलाम

राजगुरूनगर – महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा तैल बैला टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत राकट, कणखर दगडांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्र देशास प्रणाम केला आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करून आणि कामगारांच्या कार्यास सलाम करून तिरंगा फडकाविला.

या मोहीमेची सुरवात मुळशी तालुक्यातील तैल-बैला येथून झाली करून अवघ्या पाऊण तासांची पायपीट तैल-बैला च्या पायथ्याला घेऊन जाते. आरोहणासाठी सुमारे एक तास लागतो. हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून आरोहण करावे लागते.

पहिला १०० फुटी टप्पा पार केल्यावर एक छोटा ट्रॅवर्स मारल्यावर २० फुट आरोहण केल्यावर दुसरा टप्पा येतो. या नंतर अंगावर येणारा पुढील १०० फुटी टप्पा चिकाटीने पार करताना कस लागतो. शेवटचा ३० फुटी टप्पा पार केल्यावर शिखर गाठता येते.

शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील ३०० फुटी सरळसोट कठीण चढाई, २०० फुटी रॅपलिंगचा थरार, पाहताक्षणीच मनात धडकी भरावी असे तैल-बैलाचे रांगडे रूप, अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या जॅकी साळुंके, चेतन शिंदे, मंदार चौधरी, सिद्धार्थ बावीसकर, अक्षय कातोरे, महेश जाधव, वैभव गांगुर्डे, पूजा साळुंके, सुवर्णा कांगणे, राजश्री चौधरी, कमलसिंग क्षत्रिय, अनुराग दांडेकर, सचिन अतुगडे, पुरुषोत्तम राऊत, निलेश खेडकर, मयुर शेटे, सचिन तुपे, बालाजी जामखेडे, प्रशील अंबाडे आणि डॉ.समीर भिसे या गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली.

Previous articleमोलमजुरी, धुणीभांडी, भाजी विकण्याची वेळ कलाकारांवर पुन्हा येऊ नये – सुरेखा पुणेकर
Next articleमंगला बनसोडेंचा पुत्र नितीन बनसोडेंने केला बैलगाड्याचा नाद ; बैलगाडा थेट तमाशाच्या व्यासपीठावर