कवठे येमाई येथील येमाई यात्रेला हजारों भाविक भक्तांची हजेरी

धनंजय साळवे – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील प्रसिध्द येमाई यात्रेला आज शनिवारी सुरुवात झाली.सकाळी येमाई देवी पालखी व छबिना सोहळा संपन्न झाला.दोन वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीनंतर भाविक भक्तांनी येमाई देवी चरणी हजारोंच्या संख्येनी हजेरी लावली.

पालखी सोहळ्यासमोर ढोल पथक तसेच लेझीम पथकांनी आपली कला सादर करुन वातावरण मंत्रमुग्ध व जोशपुर्ण करुन टाकले.यात अबालवृद्ध व तरुणही सामील झाले होते.डीजेच्या तालावर तरुणांची पावले थिरकत होती.पारंपारीक सनई,ताशा, डफ, कडे यांचा ताफाही पालखी सोहळ्यात सामिल झाले होते.

येमाई देवीच्या पालखी दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती.मंदिरात ही दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.बैलगाडा बंदीनंतर प्रथमच बैलगाडा मालक व शौकीनांनी शर्यतीसाठी गर्दी केली होती. यावेळी तरुणांची उपस्थिति ठळकपणे जाणवत होती.शंभराच्या वरती बैलगाडे शर्यतीत धावले.टाकळी हाजी येथील बन्सी घोडे यांच्या गाड्याने सर्वांची मने जि़कली.रात्री करमणुकीसाठीआम्रपाली पुणेकर यांचा तमाशा फडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.तर दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी कुस्त्यांचे फड व रात्री गावात रेखा शकुंतला नगरकर यांचा तमाशाचा कार्यक्रम होईल.

Previous articleमहापुरुषांचे कार्य माता, माती आणि मातृभूमी साठी सर्वोच्च – खा.डॉ.अमोल कोल्हे
Next articleपत्रकार मोसीन काठेवाडी यांचा आदर्श पत्रकारितेचा आंबेगाव भूषण पुरस्काराने गौरव