सहाव्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाध्यक्षपदी शरद गोरे

उरुळी कांचन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ६ वे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शरद गोरे यांची निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मंडणगड तालुका अध्यक्ष संदीप तोडकर यांनी दिली आहे. १७ एप्रिल २०२२ रोजी मंडणगड (रत्नागिरी) येथे संमेलन संपन्न होणार आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ शरद गोरे यांनी मराठीत काव्य भाषांतरित केला आहे. या सह इतर दहा ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गोरे यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.

रणांगण एक संघर्ष, उष:काल, प्रेमरंग, एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक केले आहे व संगीत हि दिले आहे आजवर त्यांची महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासावर हजारो व्याख्याने झाली आहेत.

उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरुप असणार आहे,
डॉ. अ.ना. रसनकुटे ( कोकण प्रदेशाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली आहे. या बैठकीस संगीता पंदिरकर- मंडणगड (उपाध्यक्षा) संजय करावडे (सचिव), पुंडलिक शिंदे (सहसचिव), शंकर जंगम – (सहकार्याध्यक्ष), शैलेश शिगवण – (खजिनदार), आदीजण उपस्थित होते.

Previous articleसहकुटुंब सहलीसाठी रामदरा उत्तम पर्याय -राजेंद्र काळभोर
Next articleकिरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची हवेली तालुका शिवसेनेची मागणी