अजयशेठ हिंगे पाटील कडे पाहून”आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर कसे बनवायचे असते.. हे त्याच्याकडून शिका

Ad 1

अमोल भोसले उरुळी कांचन प्रतिनिधी

शिरुर तालुक्यात नवीनच आलेली MIDC
इतरांप्रमाणे कंपनीत कामाला जायची हौस. तो एक घातवार, एक पावसाळी दिवस आणि अचानकपणे समोर आलेला ट्रक. डोळ्यासमोर आलेली अंधारी अन मग भयंकर अपघात.चक्काचूरच..पाहिलेल्या स्वप्नांचा.सोबतच्या मित्राचा..गाडीचा..आणि मणक्याचा..सोबतचा जिवलग मित्र जागीच देवाघरी गेलेला…पण हा मात्र थोडक्यात मृत्यूला हुलकावणी देऊन माघारी आला…पाहतो तर काय मणक्याला मार, अन उर्वरित देह निष्प्राण…पुण्याच्या बुधरानी हॉस्पिटलमध्ये उपचार झाले पण डॉक्टरांनी हात टेकले…त्याची चिडचिड झाली तगमग झाली नशिबाला शिव्या पण देऊन झाल्या…आईबापाची माया व सगळ्या कुटुंबाने ( एकत्रित कुटुंब ) घरच्यांनी, शक्य होते ते सगळे केलं. सगळे हॉस्पिटल, डॉक्टर, वैद्य हकीम, देव देवऋर्षी सगळं केलं…पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं, सगळे उपाय थकले, हालचाल बंदच… इथून पुढचे आयुष्य असेच एक जागेवर बसून काढायचे हे ऐकून तो काहीसा खचला पण घरच्यांच्या प्रेरणेने आयुष्याशी झुंजू लागला, अडचणींशी लढू लागला…तसा गडी बारीक, पण हो, ना हा गडी खचला, ना त्याच्या घरचे खचले…बसल्याजागी काहीतरी समाजोपयोगी कार्य करायची इच्छा मनात ठाण मांडून…आणि मग एक आशेचा किरण दिसला, तो जमाना होता सोशल मीडियाचा… याच सोशल मिडियाचा आधार घेऊन देशात मोदींनी सत्तांतर केलं…सोशल मिडियाची ताकत लक्षात आली, मग त्यावर हा सक्रिय झाला, समाजाचे प्रश्न मांडू लागला..घरची राजकीय परंपरा, त्यामुळं मोठ्या मोठ्या तालेवार नेत्यांचे घरी येणं जाणं…त्याची सोशल मीडियावरची सक्रियता व त्याची गुणवत्ता शिरुर – हवेली तालुक्याचे आमदार ॲड् अशोक पवार यांनी हेरली..त्याला राष्ट्रवादी पक्षाचे सोशल मीडिया तालुका अध्यक्ष पद देऊ केले…इथून पुढे चालू झाली त्याच्या आयुष्याची दुसरी इनिंग…जगण्याचा अंदाजच बदलून गेला.. प्रभावी पद हाती आल्याने तो सुंदर लिहू लागला, सगळीकडे पक्षाची बाजू समर्थपणे मांडू लागला…आमदार अशोक पवार यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली कामे जनतेपुढे मांडू लागला, तालुक्यातील अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडू लागला… जगण्याला अर्थ मिळाला .. दिशा मिळाली .. नवे ध्येय व उद्देश मिळाला….आणि मित्रांच्या लाडक्या अज्या वरून थेट अजयशेठ हिंगे पाटील हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात व राष्ट्रवादी पक्षात प्रसिद्ध झाले…इकडे कधी सभा, राजकीय दौरे झाले की नेते मंडळी आवर्जून घरी येऊन भेट घेऊन कौतुक करू लागले…अगदी राष्ट्रवादीचे कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील त्याची वैयक्तिक भेट घेऊन कौतुक केलं…महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तोंड भरुन त्याच्या लिखाणाचे कौतुक केलं…खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांनी देखील कौतुकाची थाप पाठीवर देऊ लागल्या. आणि अजयशेठ राष्ट्रवादीच्या सर्वच मान्यवरांचा गळ्यातला ताईत बनला. अनेक मान्यवरांचे अजयशेठच्या घरी येणे जाणे सुरु झाले. यामध्ये प्रामुख्याने शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे, प्रदेश राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, मंत्री बच्चू कडू , शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सचिव सतीशजी राऊत सर, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी आय टी सेलचे प्रमुख सारंग श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, पुणे जिल्हा परिषद माजी सभापती प्रवीण माने, मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुुपेश म्हाळसकर, राष्ट्रवादी प्रदेश युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे-पाटील, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष करण कोकणे, सन्माननीय सुहास उभे यांचा समावेश होतो. मंंत्री ना. दिलीपराव वळसे पाटील, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी देखील प्रत्यक्ष भेटून कौतुक केले.

अजयशेठ यांच्या कार्याची दखल घेत प्रशासकीय अधिकारी साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब ( IAS ), किशोरराजे निंबाळकर साहेब ( IAS ) सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन आणि डिव्हिजनल फाॅरेस्ट ऑफिसर ( Retd ) दयानंद घाडगे यांनी देखील अजयशेठ यांची निवासस्थानी भेट घेऊन कौतुक केले. अजयशेठ यांच्या कार्याची भुरळ केवळ राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांपुरती मर्यादित नव्हती तर चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना देखील त्यांनी आकृष्ट केले. यामध्ये चित्रपट निर्माता दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, अभिनेता भाऊसाहेब शिंदे, अभिनेता अभय चव्हाण, अभिनेत्री गायत्री जाधव, अभिनेत्री प्रांजल कंजारकर, तसेच स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील प्राजक्ता गायकवाड, गणेश लोणारे यांनी देखील अजयशेठ यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे कौतुक केले. आमदार अमोल मिटकरी तसेच राष्ट्रवादी प्रदेश सोशल मीडिया प्रमुख आदिती नलवडे आणि राष्ट्रवादी प्रदेश विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी देखील फोन करून कामकाजाची माहिती घेतली आणि कौतुक केले. अजयशेठ यांच्या कामकाजाची दखल घेत अनेक मान्यवर पत्रकारांनी देखील अजयशेठ यांची भेट घेतली..त्यांचे कौतुक केले.. त्यांना प्रोत्साहन दिले.

यामध्ये झी 24 तासचे हेमंत चापुडे, संवाद वाहिनीचे मदन काळे त्यांच्या पत्नी दिपाली काळे, पत्रकार मित्र नितीन बारवकर, प्रताप भोईटे, डॉ. योगेश मारणे, पोपटराव पाचंगे, रवी पाटील, संजय गायकवाड, तेजस फड़के, प्रमोल कुसेकर, सतीश केदारी, संतोष धायबर, प्रमोद लांडे, अभिजीत आंबेकर, अमोल भोसले, धर्मा मैड आदिंचा त्यात समावेश आहे.खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार आदि मान्यवरांनी तसेच अभिनेत्री माधुरी पवार यांनी देखील त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फेसबुकवर पोस्ट करून त्याचे कौतुक केले.

मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरुर – हवेली तालुक्याचे आमदार ॲड् अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ सुजाता पवार व राष्ट्रवादी पक्षातील व इतर सगळ्याच पक्षाची दिग्गज नेतेमंडळी सुद्धा वेळोवेळी घरी येऊन त्याच्या तब्येतीची विचारपूस करतात.., लिखाणाचे कौतुक करतात…शिरुर – हवेली मतदार संघातील सर्वच प्रमुख नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अजयशेठचे घर म्हणजे आपलेच घर वाटते.
बिछान्यावर पडून असलेला एक सामान्य तरुण केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला.. अजयशेठच्या आजच्या यशामध्ये जेवढा वाटा अजयशेठच्या परिवाराचा आहे तेवढाच वाटा शिरूर – हवेलीचे आमदार ॲड् अशोक पवार त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांचा देखील आहे. आमदार पवार यांचा मुलांचा तर तो लाडका दादा आहे. आमदार अशोक पवार यांनी अजयशेठला जगण्याची फक्त उमेदच दिली नाही तर त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त करुन दिला, त्याच्यातील गुणवत्तेला न्याय देऊन त्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या झोतात नेले.

त्याचबरोबर शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा तर अजयशेठवर विशेष लक्ष आहे. जगण्याची उमेद कधी हरायची नसते हेच अजयशेठ कडून शिकायला मिळते…तुमच्याकडे उमेद असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते… त्याच्या या प्रवासात त्याला साथ देणाऱ्या त्याच्या घरच्या मंडळींचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण अंथरुणावर असलेल्या अजयशेठची, त्याच्या आरोग्याची, त्याच्या स्वच्छतेची ते सर्वार्थाने काळजी तर घेतातच पण प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अजयशेठला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचा पाहुणचार आणि यथोचित सन्मान देखील ते करतात.

अजयशेठ यांच्या तब्येतीची पुरेपूर काळजी घेत डॉ योगेश सोनी सर पुणे, डॉ बाळासाहेब सात्रस न्हावरे, डॉ रणजीत परदेशी न्हावरे, डॉ दिलीप गेलोत न्हावरे आदि त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम करतात.आज आपण समाजात वावरताना निराश झालेले, परिस्थितीने हरलेले, दमलेले, थकलेले, आजाराला वैतागलेले अनेक लोकं पाहतो, मग नैराश्याच्या भरात यातले अनेकजण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात…त्या सगळ्या लोकांना हेच सांगायचं आहे की, या इकडे व आमच्या अजयशेठकडे पहा, आयुष्य सुंदर आहे त्याला अजून सुंदर कसे बनवायचे असते, हे त्याच्याकडून शिका… कधीही टोकाचे पाऊल उचलू नका… मी माणुसकीचे नाते आणि निखळ आनंद देणारी मैत्री जपतो…अजयशेठ मित्रा तुला तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला हव्या तितक्या, कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा, तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत, तुझी ही उमेद कायमस्वरूपी राहो व तुझ्या उत्तम आरोग्यासाठी मी श्री भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो व थांबतो…

शब्द संकल्पना – अमोल घायतडक