खडकवासला धरण पूर्ण भरले,नदीकाठी सावधानतेचा इशारा

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण पूर्ण भरलेले आहे, त्यामुळे सध्या खडकवासला धरणातून आज(13 ऑगस्ट) सांयकाळी 5 वाजता 11705 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये बदल होऊ शकतो असे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे,आपत्ती व्यवस्थापन शाखेच्या वतीने तहसीलदार पुणे शहर,हवेली,शिरूर,दौंड व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष महानगरपालिका पुणे यांना सांगून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यासाठी सांगण्यात आले आहे.
नदी पात्रातील विसर्गात बदल होत असल्याने नदी पात्रात कोणीही जावू नये,अथवा फिरू नये,तसेच आवश्यक ती योग्य खबरदारी घेण्यात यावी असे नागरिकांना सांगण्यात येत आहे.