मधुकर गिलबिले यांचा समाजकार्य प्रेरणा पुरस्काराने गौरव

राजगुरूनगर -येथील प्राथमिक शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मधुकर गिलबिले गुरुजी याना नुकताच कराड येथे स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर समाजकार्य प्रेरणा पुरस्कार देण्यात आला.जी.के गुजर मेमोरियल ट्रस्ट बनवडी कराड यांच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी भाई गुजर यांच्या ३३ व्या पुण्य स्मरण दिनानिमित्त राज्यातील स्वातंत्र्य सैनिक वंशज,सामाजिक कार्यकर्ते यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

मधुकर गिलबिले हे येथील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव स्मृती स्थळ बसस्थानक येथे अनेक वर्ष दैनिक पूजा करत आहेत, हुतात्मा राजगुरू जीवन चरित्रावर अनेक व्याख्याने, समाधी स्थळ पंजाब भेट,तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी चार पुस्तके लिहिली आहेत.अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो या सर्व कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी जी.के .गुजर मेमोरियल ट्रस्ट अध्यक्ष डॉ. अशोक गुजर , डॉ.माधुरी गुजर ,भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव समिती अध्यक्ष संपतराव जाधव , क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समिती अध्यक्ष बाबा राव मुठाळ , माजी नगराध्यक्ष नंदकुमार भटाने, कृषी अधिकारी विलास पवार,तसेच केंद्रप्रमुख गजानन पुरी,शिक्षक तानाजी चौधरी,सुभाष सांडभोर, साहित्यिक संतोष गाढवे यांसह राज्यातून आलेले सामाजिक कार्यकर्ते, विद्या नगर बनवडी येथील विद्यार्थी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाल्याने गिलबिले गुरूजींचा सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Previous articleधामणीकरांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आठवड्यात मार्गी लागणार – विवेक वळसे पाटील
Next articleतलाठी महिलेस २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले