“जागर आरोग्याचा” कार्यक्रम उत्साहात

नारायणगाव,किरण वाजगे

जागतिक महिला दिनानिमित्त नारायणगाव मध्ये सावित्रीबाई फुले महिला विकास संस्था व इंद्रधनू ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “जागर आरोग्याचा”हा कार्यक्रम इंदिरानगर व राजवाडा या भागात घेण्यात आला. यावेळी डॉक्टर स्मिता डोळे’ व डॉक्टर पल्लवी राऊत ‘यांचे महिलांच्या आरोग्या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले.

महिलांचा आहार,महिलांना होणारे आजार,ब्रेस्ट कॅन्सर, मुलांचे मानसशास्त्र, मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढेल, वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्य विषयक समस्या, आपली प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, कोणता आहार घ्यावा,तसेच आपली व आपल्या कुटुंबाची व परिसराची स्वच्छता कशी राखावी इत्यादी अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांना व मुलींना डेटॉल हॅन्ड वॉश व सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर, पुष्पा जाधव, सुरेखा वाजगे, शितल ठूसे,भारती खिवंसरा, निर्मला गायकवाड, ज्योती गांधी, शैलेजा भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शितल ठुसे यांनी केले.

Previous articleभावकीच्या वादातून ३९ वर्षीय तरूणाची हत्या : सात जणांवर गुन्हा दाखल
Next articleविठ्ठल विकास सोसायटीवर शिवसेनेचा भगवा ; शिवसेनेचे बाळासाहेब पायगुडे चेअरमनपदी