अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या सहसंपर्क प्रमुखपदी विनोद महाळुंगकर यांची निवड

चाकण-श्री क्षेत्र महाळुंगे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री समर्थ सद्गुरु श्रीपती बाबा महाराज यांचे निस्सीम भक्त व खेड तालुका अध्यात्मिक सामाजिक युवक चळवळीचे विश्वस्त ह. भ. प विनोद महाळुंगकर यांची महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या सहसंपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले यांनी नुकतीच दिली.

विनोदभाऊ महाळुंगकर यांची सहसंपर्क प्रमुख पदी निवड झाल्यानंतर श्री क्षेत्र महाळुंगे येथील युवा उद्योजक खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खजिनदार लीलाधर तुपे, युवा उद्योजक तथा जय हिंद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुलभाऊ जावळे, सम्राट तुपे, पुनीत पवार, अमन मिंडे, युवासेना शाखा प्रमुख विशाल पवार, श्रीकांत पाडेकर यांच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच विनोदभाऊ महाळुंगकर पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleसहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील यांचे निलंबन तर पोलीस नाईक हांडे सेवेतून बडतर्फ
Next articleखानापूर केंद्रातील वीज बिल दुरूस्तीबाबत शिवसेनेच्या वतीने उप अभियंता यांना