खानापूर केंद्रातील वीज बिल दुरूस्तीबाबत शिवसेनेच्या वतीने उप अभियंता यांना

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व लाॅकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना विज बिल हे मीटर रिडींग न घेता सरासरी वापर गृहीत धरून आकारण्यात आले आहे. खानापूर या केंद्राच्या अंतर्गत अनेक गावे येतात.

या गावातील नागरिकांना विज बिल दुरूस्तीसाठी खानापूर अथवा भरे येथे जावे लागतेे. परंतु सध्याच्या परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने नागरिकांना येण्या जाण्याची गैरसोय होत असल्याने त्यांना बिल दुरूस्तीसाठी येता येत नाही. यासाठी शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने नितीन वाघ, संतोष शेलार,रामदास गायकवाड यांनी उप अभियंता महावितरण मुळशी ग्रामीण विभाग यांना निवेदनाद्वारे विनंती केली की, बिल दुरूस्तीसाठी असणारे अधिकारी यांना संबंधित गावातील ग्रामपंचायत कार्यालयात एक दिवस ठरवून पाठवावे. जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही व दुरुस्तीनंतर लोक बिल भरतील व थकबाकी वाढणार नाही आणि लोकांना विनाकारण दंड व व्याज आकारणी होणार नाही, ही विनंती करण्यात आली.

Previous articleअखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या सहसंपर्क प्रमुखपदी विनोद महाळुंगकर यांची निवड
Next articleचाकण तळेगाव रस्त्याची दयनीय अवस्था