गार्डियन गिरिप्रेमी पुणे संस्थेचा बेसिक व अडव्हान्स रॉक क्लाइंब कोर्स यशस्वी रित्या संपन्न

राजगुरूनगर- आनंदासाठी गिर्यारोहण या संकल्पनेतून साकारलेल्या गार्डियन गिरिप्रेमी पुणे या संस्थेचा सुरक्षित आणि टेक्निकल प्रस्तरारोहण कोर्स म्हणजेच (BRCC & ARCC) किल्ले सिंहगड येथे आयोजित करण्यात आला होता. 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी अशा चार दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत जवळपास 25 युवा गिर्यारोहक सहभागी झाले होते.

प्रस्तरारोहण इक्विपमेंट ची ओळख आणि त्यांचा वापर तसेच लिड क्लाइंबिंग तसेच मल्टी पिच क्लाइंबिंग, मॅपिंग, जूमेरींग, नेवीगेशन आदी बाबी या कोर्स मध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या.

संस्थेचे संस्थापक मा. उमेश झिरपे व मुख्य इन्स्ट्रक्टर मा. भुषण हर्षे यांनी आपल्या गिर्यारोहण क्षेत्रातील मोहिमांची माहिती आपल्या भाषणातून दिली आणि युवा गिर्यारोहकांना अमूल्य मार्गदर्शन केले. सुमित मांदऴे, पवन हाडोळे, वरुण भागवत, लोकेश शिंदे, पद्मजा आदी हिमालयातील मोहिमांचा आणि सह्याद्रीतील गिर्यारोहणाचा दांडगा अनुभव असणारे संस्थेचे गिर्यारोहक या कार्यशाळेत इंस्ट्रक्टर म्हणून कार्यरत होते. या कार्यशाळेत युवा गिर्यारोहक अक्षय भोगाडे, अभिजित पंडित, केतकी सहस्रबुद्धे, अंतरा जोशी, पियूष संधीकर, प्रसाद चव्हाण, प्रवीण गायकवाड, डेबारती चॅटर्जी आदी सहभागी झाले होते.

भावी पिढीचे गिर्यारोहण सुरक्षित व्हावे आणि गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार समाजात रुजावा हेच या संस्थेचे उद्दिष्ट आहे.

Previous articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त अभिवादन
Next articleअसंघटित , कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय मजदूर संघ उतरणार रस्त्यावर