लग्न समारंभाचा अतिरेक खर्च टाळून समाजासाठी रुग्णवाहिकेची भेट : वाघोलीतील बहिरट परिवाराचा समाजासमोर वेगळा आदर्श

उरुळी कांचन

कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण जगाला जागेवर थांबण्यास या महामारी ने भाग पाडले लोकांकडे लाखो रुपयाच्या गाड्या असतानाही त्या कुचकामी ठरल्या या संकटाच्या काळात धावून आली ती फक्त रुग्णवाहिका. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाज हितासाठी काळाची गरज ओळखून उदात्त हेतूने समाज हितासाठी एक रुग्णवाहिका भेट देऊन वाघोली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाअसलेल्या बहिरट परिवाराने समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे

या कुटुंबातील माहिती सेवा समितीचे हवेली तालुका अध्यक्ष असलेल्या चिरंजीव कमलेश यांनी माहिती सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांच्या मार्गदर्शनातून स्वतःच्या शुभविवाह प्रित्यर्थ समाजातील खरी गरज ओळखून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा डाळिंब वन तालुका दौंड येथील धाकलं पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये येथील म्हस्के परिवाराची सुकन्या चि सौ कां पूजा हीच्याबरोबर सप्तपदी करत असताना मावळत्या सूर्याच्या साक्षीने सकल समाज हितासाठी अनमोल भेट देऊन आजच्या तरुणाईने बँड बाजा वरात यांचा अतिरेक खर्च टाळून समाजासाठी असे अनमोल कार्य करण्याचा एक चांगला संदेश दिला आहे.

याप्रसंगी परिसरामध्ये एक वड व गुलाब अशा दोन झाडांचे उभय नवोदित वधू-वरांनी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा असा चांगला संदेश देण्यात आला आहे. बहिरट व म्हस्के या परिवाराच्या आगळ्यावेगळ्या रुग्णवाहिका भेटीची परिसरामध्ये चर्चा होत असताना या अनमोल उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यामध्ये प्रामुख्याने माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, ज्ञानेश्वर कटके (सदस्य जिल्हा परिषद)पुणे, रामकृष्ण सातव पाटील ( सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे जिल्हा ), जयश्री सातव पाटील (मा.सरपंच वाघोली), मीना (काकी )सातव पाटील, अर्चना कटके (मा.सदस्य जिल्हा परिषद पुणे ), सुरेखा भोरडे (महीला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हवेली), शरदराव टेमगीरे (कार्याध्यक्ष शिरूर तालुका माहिती सेवा समिती), मोहीनी तांबे (महीला अध्यक्ष माहिती सेवा समिती हवेली तालुका), मारुती गाडे (मा.उपसरपंच वाघोली), राहुल तांबे (मा.सरपंच भावडी), पोलीस हवालदार सावंत, वन अधिकारी वायकर, पोलिस हवालदार ढमढेरे उद्योजक विजय गायकवाड , बापुसाहेब सातव, विशाल बहीरट, संतोष बहीरट, सतीश जगताप आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन संतोष हीरामण सातव यांनी केले व लग्नं समारंभ पार पडला.

Previous articleकास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Next articleडॉ.वर्षा गुंजाळ यांची जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती