कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी

दिनेश पवार , दौंड

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी उपस्थितांना माता रमाई यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली .अण्णा नामदास ,विनोदकुमार भिसे , तात्यासाहेब झेंडे ,शफिक इनामदार यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा संघटक दीपक कदम ,आण्णा नामदास, जालिंदर बालगुडे, शफीक इनामदार, तात्यासाहेब झेंडे उपाध्यक्ष बारामती तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे सुनिल कुचेकर , मुख्याध्यापक शाळा शिर्सूफळ हनुमंत आगवणे व बारामती तालुका कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका प्रसिद्धीप्रमुख गोरक्षनाथ लडकत यांनी केले .

Previous articleवाघोली-शिरूर दुमजली पुलासह १८ पदरी रस्त्याच्या कामासाठी कन्सल्टंन्ट नियुक्त : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
Next articleलग्न समारंभाचा अतिरेक खर्च टाळून समाजासाठी रुग्णवाहिकेची भेट : वाघोलीतील बहिरट परिवाराचा समाजासमोर वेगळा आदर्श