डॉ.वर्षा गुंजाळ यांची जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती

किरण वाजगे,नारायणगाव

वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा संजय गुंजाळ यांची जुन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

डॉक्टर गुंजाळ यांनी सन २००५ मध्ये वारूळवाडी येथे आपल्या शासकीय वैद्यकीय सेवेस प्रारंभ केला. सन २००५ ते २०१२ या कालावधीत त्या वारूळवाडी येथे कार्यकाल पूर्ण केल्यानंतर निमगाव सावा येथे २०१२ ते २०१६ सालापर्यंत कार्यरत होत्या. त्यानंतर २०१६ ते आजतागायत त्या पुन्हा वारुळवाडी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक आरोग्य शिबिरे, आरोग्य जनजागरण मोहीमा, आरोग्य विषयक उपक्रम तसेच केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामार्फत असलेल्या आरोग्यविषयक जनसामान्यांच्या योजना त्यांनी प्रभावीपणे त्यांच्या कार्यक्षेत्रात राबविल्या. याच कारणामुळे त्यांना निमगाव सावा येथे असताना नॅशनल क्वालिटी एशूरन्स (NQS) व नॅशनल एक्रिडेशन बोर्ड (NABS) हे नामांकन मिळाले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आरोग्य विभाग विभागात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणारा डॉ आनंदीबाई जोशी पुरस्कार देखील डॉक्टर वर्षा यांना मिळाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, माजी आमदार शरद सोनवणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleलग्न समारंभाचा अतिरेक खर्च टाळून समाजासाठी रुग्णवाहिकेची भेट : वाघोलीतील बहिरट परिवाराचा समाजासमोर वेगळा आदर्श
Next articleBREKING NEWS – वाघोलीत ९ वर्षीय मुलीचा भैरवनाथ तलावात पडून मृत्यू