दौंड नगरपरिषद तर्फे पर्यावरण पूरक मकरसंक्रांत साजरी

दिनेश पवार,दौंड

माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत दौंड नगर परिषद कार्यालयात पर्यावरणपूरक मकर संक्रात कापडी पिशवी आणि झाडांची रोपे देऊन साजरी करण्यात आली.माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण पूरक विचार जोपासण्यासाठी हरीत शपथ घेण्यात आली. कापडी पिशवीचा वापर करून पर्यावरण संवर्धनासाठी आपण एक पाऊल पुढे टाकत नक्कीच बदल घडवून आणू शकतो,असे मत उपमुख्याअधिकारी सुप्रिया गुरव यांनी व्यक्त केले.

यावेळी दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शीतल कटरिया,उपनगराध्यक्षा कांचन साळवे,उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव,माझी वसुंधरा अभियान च्या नोडल अधिकारी स्मिता म्हस्के, वर्षाराणी सावंत,दिपक म्हस्के,विद्या भुजबळ,सुरैय्या शेख,कौसर सय्यद, नितीन तुपसौंदर्य,अमर सोनवणे,शुभम चौकटे तसेच इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleचाकणमध्ये दुकानदाराकडे महिन्याला १० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या बोगस पत्रकारासह, पुरवठा अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक
Next articleस्वत:च्याच लग्नाची खरेदी करुन परताना मुलीचा अपघातात मृत्यू ; अवघ्या गावावर शोककळा.